या कारणांमुळेच धोनी टी-20 संघातून झाला 'आऊट'

धोनीसारख्या मोठ्या खेळाडूला संघाबाहेर ठेवण्याची काय कारणं आहेत, हे जाणून घेऊया.

  • Share this:

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज महेंद्रसिंग धोनीला वेस्ट इंडिजविरूद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेतून वगळण्यात आलं आहे. तसंच ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-20 संघातही धोनीला स्थान देण्यात आलेलं नाही. धोनीसारख्या मोठ्या खेळाडूला संघाबाहेर ठेवण्याची काय कारणं आहेत, हे जाणून घेऊया.

महेंद्रसिंग धोनीला संघातून वगळण्याची अनेक कारणं आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे धोनीने 2018 मध्ये केवळ 70.47 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. धोनीची करिअरमधील ही सर्वात खराब कामगिरी आहे.

टी-20 संघातून धोनी आऊट होण्यामागील दुसरं कारण म्हणजे वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेत धोनीकडून झालेली निराशाजनक कामगिरी. इंग्लंडमध्ये धावा करताना धोनीला मोठा संघर्ष करावा लागला होता.

महेंद्रसिंग धोनी सुरूवातीप्रमाणे आता सहज धावा करताना पाहायला मिळत नाही. विकेटकिपिंगमध्ये धोनीची दमदार कामगिरी होत असली तरीही फलंदाजीत फिनिशर म्हणून तो अपयशी ठरत आहे.

युवा ऋषभ पंतची दमदार कामगिरी, हेदेखील धोनीला संघाबाहेर ठेवण्याचं महत्त्वाचं कारण आहे. ऋषभ पंतने त्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवला आहे. कसोटीत ऋषभने चांगली कामगिरी केली. त्यामुळे निवड समितीने त्याला वनडेतही संधी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2018 01:01 PM IST

ताज्या बातम्या