Home /News /sport /

IND vs SA : वनडे सीरिज गमावल्यानंतर राहुलची इमोशनल पोस्ट, आथिया शेट्टीनेही केली कमेंट

IND vs SA : वनडे सीरिज गमावल्यानंतर राहुलची इमोशनल पोस्ट, आथिया शेट्टीनेही केली कमेंट

दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये टीम इंडियाची (India tour of South Africa) कामगिरी निराशाजनक झाली. पहिली टेस्ट मॅच जिंकल्यानंतर भारताने उरलेल्या दोन्ही टेस्ट गमावल्या, यानंतर वनडे सीरिजमध्येही टीमचा 3-0 ने पराभव झाला. टेस्ट सीरिजमधल्या एका सामन्यात आणि संपूर्ण वनडे सीरिजमध्ये केएल राहुल (KL Rahul)टीमचा कर्णधार होता.

पुढे वाचा ...
  केपटाऊन, 24 जानेवारी : दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये टीम इंडियाची (India tour of South Africa) कामगिरी निराशाजनक झाली. पहिली टेस्ट मॅच जिंकल्यानंतर भारताने उरलेल्या दोन्ही टेस्ट गमावल्या, यानंतर वनडे सीरिजमध्येही टीमचा 3-0 ने पराभव झाला. टेस्ट सीरिजमधल्या एका सामन्यात आणि संपूर्ण वनडे सीरिजमध्ये केएल राहुल (KL Rahul)टीमचा कर्णधार होता. वनडे सीरिजमधल्या पराभवानंतर केएल राहुलने सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट शेयर केली आहे. वनडे सीरिजची तिसरी वनडे (IND vs SA 3rd ODI) टीम इंडियाने 4 रनने गमावली. याचसोबत कर्णधार केएल राहुलच्या नावावर लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. वनडे सीरिजच्या तिन्ही मॅच गमावणारा केएल राहुल पहिलाच भारतीय कर्णधार बनला आहे. केएल राहुलने सोमवारी सोशल मीडियावर सहकारी खेळाडूंचा एक फोटो शेयर केला. 'कठीण काळ तुम्हाला चांगला आणि मजबूत बनवतो. परिणाम आमच्यासाठी अनुकूल राहिले नाहीत, पण या चुकांमधून आम्ही शिकू. देशाचं नेतृत्व करणं सन्मान आणि गौरवाचा क्षण होता. याला मी शब्दांमध्ये मांडू शकत नाही. काम कधीच थांबत नाही, कारण आम्ही आणखी चांगलं करण्यासाठी आणि कधीच हार न मानण्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद,' अशी पोस्ट राहुलने लिहिली.
  View this post on Instagram

  A post shared by KL Rahul👑 (@rahulkl)

  राहुलच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्याला पाठिंबा दिला आहे. राहुलच्या या पोस्टला दोन तासांमध्ये 3.6 लाख यूजर्सनी लाईक केलं. एवढच नाही तर 2500 कमेंटही केल्या. श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन या खेळाडूंनीही राहुलच्या पोस्टवर कमेंट केली. बॉलीवूड अभिनेत्री आणि केएल राहुलची गर्लफ्रेंड आथिया शेट्टीनेही (Athiya Shetty) राहुलच्या पोस्टवर कमेंट केली. आथियाने या पोस्टवर हृदयाची इमोजी शेयर केली. आथियाच्या या कमेंटला जवळपास 900 जणांनी लाईक केलं. athiya shetty comment on kl rahul post केएल राहुलने पहिल्या टेस्टमध्ये शानदार शतक झळकावलं होतं. पण यानंतर त्याला फार मोठा स्कोअर करता आला नाही. पहिल्या वनडेमध्ये त्याने 12 रन, दुसऱ्या वनडेमध्ये 55 रन आणि तिसऱ्या वनडेमध्ये 9 रन केल्या.
  Published by:Shreyas
  First published:

  Tags: Kl rahul, Team india

  पुढील बातम्या