मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /केएल राहुल-श्रेयस अय्यरला IPL Auction मधून डच्चू, पण तरीही हे दोघे होणार मालामाल

केएल राहुल-श्रेयस अय्यरला IPL Auction मधून डच्चू, पण तरीही हे दोघे होणार मालामाल

केएल राहुल-श्रेयस अय्यर (kl rahul and shreyas iyer) या दोघांना संघांनी डच्चू दिला असला तरी  दोघे मालामाल होणार असल्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे.

केएल राहुल-श्रेयस अय्यर (kl rahul and shreyas iyer) या दोघांना संघांनी डच्चू दिला असला तरी दोघे मालामाल होणार असल्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे.

केएल राहुल-श्रेयस अय्यर (kl rahul and shreyas iyer) या दोघांना संघांनी डच्चू दिला असला तरी दोघे मालामाल होणार असल्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे.

नवी दिल्ली, 1 डिसेंबर: आयपीएल 2022 (IPL2022 Auction)पूर्वी कोणते खेळाडू रिटेन होणार याची उत्सुरकता आता संपली आहे. प्रत्येक टीमला जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी होती. पण प्रत्यक्षात 4 टीमनी ही कमाल मर्यादा पूर्ण केली आहे. मात्र, काही संघांनी अनेक चांगल्या खेळाडूंना डच्चू दिला आहे. त्या यादीमध्ये केएल राहुल-श्रेयस अय्यर या दोघांचाही(kl rahul and shreyas iyer) समावेश आहे. रिटेन केलेल्या खेळांडूवर पैशांचा पाऊस पडला आहे. पण केएल राहुल-श्रेयस अय्यर या दोघांना संघांनी डच्चू दिला असला तरी दोघे मालामाल होणार असल्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे.

लिलावात जाणाऱ्या खेळाडूंमध्ये केएल राहुल, रशीद खान, शिखर धवन, श्रेयस अय्यर, भुवनेश्वर कुमार, डेव्हिड वॉर्नर, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, फाफ डू प्लेसिस, पॅट कमिन्स यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. लिलावादरम्यान संघ त्यांच्यावर मोठ्या पैशांचा पाऊस पाडू शकतात. पण दोन भारतीय खेळाडू आहेत ज्यांना लिलावापूर्वी बुक केले जाण्याची शक्यता आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर अशी त्यांची नावे आहेत.

नव्या संघाशी जुळेल दोघांचे नाते

अहमदाबादचा संघ श्रेयस अय्यर तर केएल राहुलला लखनऊमध्ये सामील करून घेण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे. दोघेही कर्णधार होऊ शकतात. अशा परिस्थितीत राहुल आणि अय्यर आयपीएलच्या दोन नव्या संघांचा भाग बनू शकतात.

गेल्या दोन हंगामात केएल राहुलने पंजाब किंग्जचे कर्णधारपद स्वीकारले. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली संघाला ना विजेतेपद मिळवता आले ना प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले. मात्र केएल राहुल धावा करण्यात सातत्याने पुढे आहे.

पंजाब किंग्समध्ये आल्यापासून, तो सतत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे आणि प्रत्येक वेळी टॉप-3 चा भाग आहे. त्याच वेळी, श्रेयस अय्यर सुमारे अडीच हंगाम दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली संघ 2019 मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचला. त्यानंतर 2020 मध्ये अंतिम सामना खेळला. यासोबतच त्याच्या बॅटमधूनही धावा निघत आहेत.

पाच संघ आहे कर्णधाराच्या शोधात

सध्या किमान पाच संघ आयपीएलमध्ये कर्णधाराच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत लिलावात केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांसारख्या चेहऱ्यांसाठी चांगलीच लढत झाली असती. पण अहमदाबाद आणि लखनऊला लिलावापूर्वीच खेळाडूंना कायम ठेवण्याचा अधिकार आहे. या जोरावर या खेळाडूंना आपल्या कोर्टात घेऊन ती कर्णधारपदाच्या संकटावर मात करू शकते. यासोबतच एक चांगला फलंदाजही सापडेल. केएल राहुलला लखनऊमधून 20 कोटी रुपये मिळू शकतात, असे समजते. पंजाबनेही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला होता पण राहुलला लिलावात जायचे होते.

अय्यर यांना दिल्लीचे कर्णधारपद हवे होते

श्रेयस अय्यरला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार व्हायचे होते. मात्र या जबाबदारीसाठी दिल्लीने ऋषभ पंतवर विश्वास ठेवला आहे. 2021 च्या मोसमात पंतने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली होती. या मोसमाच्या पूर्वार्धात अय्यर दुखापतीमुळे खेळू शकला नाही. जेव्हा दिल्लीने कर्णधार होण्यास सहमती दर्शवली नाही, तेव्हा श्रेयस अय्यरलाही कायम ठेवता आले नाही आणि तो लिलावाचा भाग बनला.

First published:
top videos

    Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, Kl rahul