केएल राहुलच्या फोटोवरून दोन अभिनेत्रींमध्ये 'कमेंटवॉर', म्हणे दोघी शेअर करू

केएल राहुलच्या फोटोवरून दोन अभिनेत्रींमध्ये 'कमेंटवॉर', म्हणे दोघी शेअर करू

भारताचा क्रिकेटपटू केएल राहुलने फोटो शेअर करताच दोन अभिनेत्रींमध्ये कमेंटवॉर रंगलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : भारताचा सलामीवीर केएल राहुल सध्या संघातून बाहेर आहे. खराब कामगिरीमुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळाली नाही. केएल राहुल मैदानावरील कामगिरीने जितका चर्चेत आहे तितकाच मैदानाबाहेरच्या गोष्टींनी चर्चेत असतो. सध्या त्याच्या आणि अभिनेत्री आथिया शेट्टीच्या अफेअरची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी केएल राहुल बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टीसोबत दिसला होता.

केएल राहुलने एक फोटो शेअर केला असून यावरून दोन अभिनेत्रीमध्ये कमेंट वॉर रंगल आहे. केएल राहुलनं एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये गॉगल घातलेला दिसत असून डेनिम जॅकेट आणि टीशर्ट परिधान केला आहे. यावर त्याने CLARITY असं कॅप्शन दिलं आहे.

View this post on Instagram

CLARITY.

A post shared by KL Rahul👑 (@rahulkl) on

फोटो पोस्ट केल्यानंतर त्याव कमेंट करताना आथिया शेट्टीनं म्हटलं की मी गॉगल माझ्याकडे ठेवून घेईन, धन्यवाद. तिच्या या कमेंटवर उत्तर देताना आकांक्षा रंजन कपूरने म्हटलं की, आपण दोघी वाटून घेऊ.आकांक्षा मॉडेल असून ती आलिया भट्टची जवळची मैत्रिण आहे. याआधी तीचे नाव केएल राहुलसोबत जोडले गेले होते.

संघातून बाहेर असलेला केएल राहुल सध्या विजय हजारे ट्रॉफीत खेळत आहे. यात त्यानं जबरदस्त कामगिरी करत आहे. त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये दोन अर्धशतकं आणि एक शतक केलं आहे. कर्नाटकचा असलेल्या केएल राहुलने आतापर्यंत भारताकडून 36 कसोटी, 23 एकदिवसीय आणि 28 टी20 सामने खेळले आहेत.

वाचा : विराटचा ऐतिहासिक दणका, आफ्रिकेवर पहिल्यांदाच ओढवली 'ही' नामुष्की

पाहा : आऊट झाला की नाही? अश्विनच्या मिस्ट्री बॉलनं सगळेच चक्रावले, VIDEO VIRAL

मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांसोबत मॉर्निंग वॉक, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: kl rahul
First Published: Oct 13, 2019 11:51 AM IST

ताज्या बातम्या