Home /News /sport /

IND vs SA: केएल राहुलचा रॉकेट थ्रो, आफ्रिकेच्या कप्तान तेंबा बावुमाला दाखवला तंबूचा रस्ता - Video

IND vs SA: केएल राहुलचा रॉकेट थ्रो, आफ्रिकेच्या कप्तान तेंबा बावुमाला दाखवला तंबूचा रस्ता - Video

भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेल्या केएल राहुलने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाला जबरदस्त थ्रो करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बावुमाला 1 चौकाराच्या मदतीने केवळ 8 (12 चेंडू) धावाच करता आल्या.

    नवी दिल्ली, 23 जानेवारी : मालिकेतील तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या (IND vs SA 3rd ODI) दक्षिण आफ्रिकेनं 287 धावा करत भारताला विजयासाठी 288 धावांचं लक्ष्य दिलंय. मात्र, यजमानांनी पहिल्या दोन वनडे जिंकून या मालिकेवर आधीच कब्जा मिळवलाय. भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेल्या केएल राहुलने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाला जबरदस्त थ्रो करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बावुमाला 1 चौकाराच्या मदतीने केवळ 8 (12 चेंडू) धावाच करता आल्या. केपटाऊनमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात केएल राहुलने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. वेगवान गोलंदाज दीपक चहरने डावाच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जे मलानला ऋषभ पंतकडे झेलबाद केले, त्यामुळे कर्णधार बावुमाला फलंदाजीसाठी लवकर उतरावे लागले. मात्र, तोही फार काही चमकदार कामगिरी करू शकला नाही आणि संघाच्या 34 धावा झाल्या असताना धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. हे वाचा - ना विराट ना रोहित.. कपिल देव यांच्या मते ‘हा’ आहे T20 WC चा सर्वात खास खेळाडू सलामीवीर आणि यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने संघासाठी सर्वाधिक 124 धावांचे योगदान दिलं. त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 17 वे शतक आणि भारताविरुद्ध सहावे शतक झळकावलं. डी कॉकने 130 चेंडूंच्या शानदार खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्याने रासी व्हॅन डरसोबत चौथ्या विकेटसाठी 144 धावांची भागीदारीही केली. व्हॅन डेरने 59 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 52 धावा केल्या. टेंबा बावुमा (Temba Bavuma)  धावबाद झाल्याचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. अनेक क्रिकेट प्रेमींनी यावर राहुलचे कौतुक केलंय, त्याच्या अचूक फेकीवर बावुमाला तंबूची वाट धरावी लागली. क्विंटन डी कॉक बाद झाल्यानंतर आफ्रिकेचे फलंदाज झटपट बाद झाले. संघाच्या 214 धावा झाल्या असताना डी कॉक चौथ्या विकेटवर बाद झाला. त्यानंतर मात्र दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा डाव 49.5 षटकांत 287 धावांवर आटोपला. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने 59 धावांत 3 तर दीपक चहर आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2 बळी घेतले. फिरकीपटू युजवेंद्र चहलनेही 1 गडी बाद केला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, South africa

    पुढील बातम्या