केएल राहुलच्या खेळामुळे पंतचे भविष्य धोक्यात? सौरव गांगुलीचा मोठा खुलासा

केएल राहुलच्या खेळामुळे पंतचे भविष्य धोक्यात? सौरव गांगुलीचा मोठा खुलासा

भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत सध्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. त्याच्याऐवजी यष्टीरक्षणाची जबाबदारी केएल राहुलवर सोपवण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 जानेवारी : भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत सध्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. त्याच्याऐवजी यष्टीरक्षणाची जबाबदारी केएल राहुलवर सोपवण्यात आली आहे. कसोटीत ऋद्धिमान साहाकडे ही जबाबदारी असून एकदिवसीय आणि टी20 मध्ये केएल राहुल सध्या यष्टीरक्षण करतो. न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिकेआधी विराट कोहलीनेही केएल राहुल यष्टीरक्षण करेल असं सांगितलं. दरम्यान, आता पंतचे भवितव्य धोक्यात आलं आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही यावर त्याचे मत व्यक्त केलं आहे.

गांगुली म्हणाला की, विराट कोहलीने केएल राहुलला संधी देण्याचा निर्णय़ घेतला आहे. संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराने केएल राहुलची भूमिका निश्चित केल्याचा खुलासा गांगुलीने केला. यष्टीरक्षक अपयशी ठरल्यानंतर इतर कोणीतरी ही जबाबदारी यशस्वीपणे पेलण्याची भारतीय संघातली ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2002-03 मध्ये राहुल द्रविडने ही जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे 2003 च्या वर्ल्ड कपवेळी संघात एक अधिक फलंदाज खेळू शकला होता.

केएल राहुलचे गांगुलीने कौतुक केले. तसेच तो असाच फॉर्म कसोटी क्रिकेटमध्येही कायम ठेवेल अशी आशा व्यक्त केली. केएल राहुलला 2019 मध्ये खराब कामगिरीमुळे कसोटी संघाबाहेर रहावं लागलं होतं. मात्र, एकदिवसीय आणि आणि टी20 मध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे.

मनीष पांडेने केली मोठी चूक! पंचांमुळे वाचला भारतीय संघ, पाहा VIDEO

एकदिवसीय आणि टी20 मध्ये केएल राहुलने चांगला खेळ दाखवला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात केली मात्र नंतर त्याची लय हरवली. पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याच्या खेळात सुधारणा आहे आणि तो पुढेही चांगला खेळ करेल.

VIDEO : पंतच्या करिअरला लागला सुरुंग! सामन्यानंतर राहुलनेच उडवली ऋषभची खिल्ली

राहुलनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत पंतच्या जागी किपिंग केली होती. त्यावेळी पंत जखमी झाला होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध राहुलनं फलंदाजीमध्येही चांगली कामगिरी केली. त्यानंतर विराट कोहलीनं 2003च्या वर्ल्ड कपमध्ये राहुल द्रविडनं जी भुमिका बजावली होती, तशीच कामगिरी राहुल करेल, असे सांगितले होते. त्यामुळं न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतही राहुलच विकेटकिपरची भुमिका पार पाडेल, असे दिसत आहे.

स्टार खेळाडूनं 13 वर्षीय मुलीला केलं किस, त्यानंतर मागितली माफी; VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2020 06:02 PM IST

ताज्या बातम्या