• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20WC नंतर Team India चा नवा कर्णधार रोहित नाही तर 'या' खेळाडूला मिळणार संधी

T20WC नंतर Team India चा नवा कर्णधार रोहित नाही तर 'या' खेळाडूला मिळणार संधी

KL Rahul

KL Rahul

न्यूझीलंडविरुद्धच्या देशांतर्गत मालिकेसाठी ( T20 Series against New Zealand) संघ निवडण्यासाठी बैठक घेणार आहे. या बैठकीदरम्यान, टी-20 इंटरनॅशनलच्या नव्या कर्णधाराच्या नावावरही शिक्कामोर्तब होणार आहे.

 • Share this:
  दुबई, 1नोव्हेंबर: चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील भारताची निवड समिती आता न्यूझीलंडविरुद्धच्या देशांतर्गत मालिकेसाठी (Home T20 Series against New Zealand) संघ निवडण्यासाठी बैठक घेणार आहे. या बैठकीदरम्यान, टी-20 इंटरनॅशनलच्या (T20 Series )नव्या कर्णधाराच्या नावावरही शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे विराट कोहलीनंतर टीम इंडियाचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा(Rohit Sharma) होणार अशी चर्चा रंगली असतानाच केएल राहुल (KL Rahul) कर्णधारपदाची भूमिका बजावू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, केएल राहुल कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे, कारण रोहित शर्माला विश्रांती देण्यात येणार आहे. रोहित शर्मा हा भारताचा नव्या T20 कर्णधारपदाचा प्रमुख दावेदार आहे. मात्र या टी-20 मालिकेतून काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे. वरिष्ठांचे व्यस्त वेळापत्रक पाहता हे पाऊल उचलले जाऊ शकते. यामुळेच केएल राहुलला कर्णधारपद मिळू शकते, कारण ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्यासाठी त्याला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आणि त्याने आपली जबाबदारी चोख बजावली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेल्या खेळाडूंना 10 नोव्हेंबरपर्यंत रिपोर्ट करावा लागेल, त्यानंतर त्यांना 5 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये पाठवले जाईल. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी खेळाडूंकडे सरावासाठी पहिल्या सामन्यापूर्वी फक्त 2 दिवसांचा वेळ असेल. दरम्यान, भारताच्या मुख्य प्रशिक्षकाच्या निवडीची सर्व औपचारिकताही पूर्ण झाली आहे. राहुल द्रविड हा मुख्य प्रशिक्षक असल्याचे मानले जात आहे. टीम इंडियाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची मुलाखत क्रिकेट सल्लागार समितीसमोर होणार आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: