मुंबई, 10 एप्रिल : रोहितच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच खेळत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाच्या गोलंदाजांची पिसं केएल राहुलनं काढली. पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करत राहुलनं मुंबईच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर पंजाबनं मुंबईला 198 धावांचे आव्हान दिलं.
Our key performer for the @lionsdenkxip is none other than the centurion, @klrahul11 🙌🙌 pic.twitter.com/cHH3fOZy8A
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2019
या सामन्यातील महत्वाची ओव्हर ठरली ती 19वी. राहुलचा जिगरी यार मानला जाणारा हार्दिंक पांड्यानं टाकलेल्या या षटकात राहुलनं धुवाधार फलंदाजी केली. 6 चेंडूत तब्बल 25 धावा केल्या.
22 in 1: Rahul says, https://t.co/eaJgYWD7tQ
— Priyanka (@cricket_kida) April 10, 2019
6 4 6 6 1 2 अशी तुफान फलंदाजी करत, राहुलनं मीच सरस आहे, असा काहीसा रुबाब हार्दिकला दाखवला. पण सामन्यानंतर खिलाडूवृत्ती दाखवत हार्दिकनं राहुलला अलिंगन देत शुभेच्छा दिल्या. दरम्यान, शेवटच्या दोन ओव्हरमध्ये मुंबईच्या गोलंदाजांनी तब्बल 41 धावा दिल्या. याआधी राहुलला ख्रिस गेलनं चांगली साथ दिली. मुंबईच्या गोलंदाजीचा समाचार घेत दोघांनी गोलंदाजांचा ही आपलं अर्धशतक पुर्ण केलं. ख्रिस गेल 63 धावा करत आऊट झाला त्यानंतर मात्र, खेळाडूंची रांगच लागली.
दरम्यान, आपल्या होमग्राऊंडवर खेळत असताना, विजयाची हॅट्रिक करण्यासाठी सज्ज असलेल्या मुंबई इंडियन्स संघानं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान रोहित शर्मा दुखापत ग्रस्त असल्यामुळं आजचा सामना खेळू शकला नाही. त्यामुळं रोहितची जागा मुंबईकर सिध्देश लाड यांन घेत क्विंटन डी’कॉक सोबत सलामीला आला. मात्र 15 धावा करत सिद्धेश आपल्या पहिल्याच सामन्यात बाद झाला.
VIDEO : भाजपच्या सभेत तुफान राडा, महाजनांसमोर माजी आमदाराला लाथाबुक्क्याने मारहाण