Home /News /sport /

निलंबन ते टीम इंडियाचा कर्णधार, केएल राहुल 3 वर्षांमध्ये झाला झिरो ते हिरो!

निलंबन ते टीम इंडियाचा कर्णधार, केएल राहुल 3 वर्षांमध्ये झाला झिरो ते हिरो!

KL Rahul

KL Rahul

तीन वर्षांमध्ये निलंबन ते टीम इंडियाचा (Team India) कर्णधार होण्याचा केएल राहुलचा (KL Rahul) प्रवास रंजक आहे. 7 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करियरमध्ये राहुलने अनेक चढ उतार पाहिले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी (India vs South Africa) रोहित शर्मा (Rohit Sharma) फिट झाला नाही, म्हणून केएल राहुलला टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 2 जानेवारी : तीन वर्षांमध्ये निलंबन ते टीम इंडियाचा (Team India) कर्णधार होण्याचा केएल राहुलचा (KL Rahul) प्रवास रंजक आहे. 7 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करियरमध्ये राहुलने अनेक चढ उतार पाहिले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी (India vs South Africa) रोहित शर्मा (Rohit Sharma) फिट झाला नाही, म्हणून केएल राहुलला टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. निवड समितीचा हा निर्णय म्हणजे केएल राहुलकडे भविष्यातला कॅप्टन म्हणून पाहिलं जात आहे. 2019 साली कॉफी विथ करण या कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि केएल राहुल यांचं निलंबन करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडूनच दोघंही भारतात परतले होते. या कारवाईमुळे दोघांना न्यूझीलंड दौऱ्यालाही मुकावं लागलं होतं. 2019 मधल्या या घटनेनंतर क्रिकेटबद्दलचा आपला दृष्टीकोन बदलल्याचं केएल राहुलने मान्य केलं. 'आमचं करियर फार मोठं नसतं, हे सगळ्यांना माहिती आहे. 11-12 वर्षच शिल्लक आहेत, त्यामुळे मला माझा पूर्ण वेळ आणि उर्जा टीमसाठी खेळण्यावर खर्च करायची आहे. मानसिकतेमध्ये बदल केल्यामुळे मला फार मदत मिळाली,' असं केएल राहुल म्हणाला. 18 एप्रिल 1992 साली बैंगलोरमध्ये जन्मलेल्या केएल राहुलने वयाच्या 10 व्या वर्षी हातात बॅट पकडली. 2010 अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये राहुल भारतीय टीमकडून खेळला. न्यूझीलंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक झाली आणि टीम सहाव्या क्रमांकावर राहिली. राहुल भारताचा सर्वाधिक रन करणारा दुसरा खेळाडू होता. 6 मॅचमध्ये त्याने 28.60 च्या सरासरीने 143 रन केल्या. त्याचवर्षी राहुलने कर्नाटककडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 2013-14 च्या रणजी ट्रॉफी मोसमात त्याने 10 मॅच खेळून 68.86 च्या सरासरीने 1033 रन केले. यानंतर निवड समितीचं राहुलकडे लक्ष गेलं. 2014-15 दुलीप ट्रॉफीमध्ये सेंट्रल झोनविरुद्धच्या सामन्यात साऊथ झोनकडून खेळताना राहुलने 185 रन आणि 130 रनची खेळी केली. यानंतर त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली. एमएस धोनीने मेलबर्नमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये रोहित शर्माऐवजी राहुलला पदार्पणाची संधी दिली. या सामन्यात राहुलची कामगिरी निराशाजनक झाली. पहिल्या इनिंगमध्ये सहाव्या नंबरवर आलेल्या राहुलने 3 रन तर दुसऱ्या इनिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर 1 रन केल्या. तरीही धोनीने त्याच्यावर विश्वास ठेवला, यानंतर सिडनी टेस्टमध्ये राहुल मुरली विजयसोबत ओपनिंगला उतरला आणि त्याने 110 रन करत पहिलं आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं. भारतामध्ये परतल्यानंतर राहुलने रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध 337 रनची खेळी केली. कर्नाटककडून त्रिशतक ठोकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. राहुलला 2016 साली झिम्बाब्वे दौऱ्यात वनडे पदार्पणाचीही संधी मिळाली. हरारेमध्ये झालेल्या सामन्यात त्याने शतक केलं. पहिल्याच वनडेमध्ये शतक करणारा राहुल पहिला भारतीय ठरला. याच दौऱ्यात राहुलने टी-20 आंतरराष्ट्रीयमध्येही पदार्पण केलं. त्याचवर्षी 27 ऑगस्टला अमेरिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध राहुलने नाबाद 110 रन केले. फक्त 20 आंतरराष्ट्रीय इनिंगमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये शतकं करण्याचा विक्रम राहुलच्या नावावर झाला. राहुल क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक करणारा 18 वा आंतरराष्ट्रीय आणि तिसरा भारतीय खेळाडू आहे. राहुलशिवाय रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनी हा विक्रम केला आहे. आयपीएलमध्ये राहुल पहिले आरसीबी आणि मग पंजाब किंग्सकडून खेळला आहे. 2018 साली पंजाब किंग्सने राहुलला 11 कोटी रुपयांना विकत घेतलं. यानंतर पहिल्याच सामन्यात त्याने 14 बॉलमध्ये अर्धशतक केलं. आयपीएल (IPL) इतिहासातलं हे सगळ्यात जलद अर्धशतक होतं. 2019 साली मुंबईविरुद्ध नाबाद 100 रन करून त्याने आपलं पहिलं आयपीएल शतक केलं. आर अश्विन 2020 साली दिल्लीच्या टीममध्ये गेल्यानंतर राहुल पंजाबचा (Punjab Kings) कर्णधार झाला. या मोसमात त्याने आरसीबीविरुद्ध 69 बॉलमध्ये 132 रन केले. हा आयपीएल इतिहासातला भारतीय खेळाडूचा सर्वाधिक स्कोअर आहे. आयपीएलच्या लागोपाठ तीन मोसमात राहुलने 600 पेक्षा अधिक रन केल्या आहेत. आता यावर्षीच्या आयपीएलमध्ये राहुल नव्या टीमकडून खेळताना दिसणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Kl rahul, Team india

    पुढील बातम्या