केएल राहुलच्या फॉर्मने फक्त पंतचे नाही तर ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूंचेही करिअर संपवले!

केएल राहुलच्या फॉर्मने फक्त पंतचे नाही तर ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूंचेही करिअर संपवले!

न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडियाचा फलंदाज केएल राहुल (KL Rahul) चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. टी-20 मालिकेत सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरल्यानंतर एकदिवसीय सामन्यातचाही शुभारंभ दणक्यात केला.

  • Share this:

हॅमिल्टन, 06 फेब्रुवारी : न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडियाचा फलंदाज केएल राहुल (KL Rahul) चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. टी-20 मालिकेत सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरल्यानंतर एकदिवसीय सामन्यातचाही शुभारंभ दणक्यात केला. केएल राहुलनं हॅमिल्टन येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात 64 चेंडूत 88 धावांची जबरदस्त कामगिरी केली. या तुफानी खेळीत राहुलनं 3 चौकार आणि 6 षटकार लगावले. आपला 30वा एकदिवसीय सामना खेळताना राहुलने 7वे अर्धशतक पूर्ण केले. न्यूझीलंडच्या भुमीवर राहुलचे हे पहिले अर्धशतक आहे.

वाचा-विराटच्या एका चुकीमुळे खेळाडूंना मिळणार नाहीत पूर्ण पैसे

केएल राहुलची शानदार खेळी

विराट कोहली बाद झाल्यानंतर केएल राहुलने क्रीजवर पाऊल ठेवले. कर्णधार विराट कोहली बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या धावा कमी होतील असे वाटत होते पण केएल राहुलने असे होऊ दिले नाही. केएल राहुल क्रीजवर उतरताना किवी गोलंदाजांची शाळा घेतली. 35 व्या षटकात केएल राहुलने इश सोधीच्या लागोपाठ दोन चेंडूंवर षटकार ठोकले. यानंतर 38 व्या षटकात राहुलने सौदीकडून दोन चेंडूंत सलग दोन षटकार ठोकले. त्याने नीशमवरही एक चांगला षटकार लगावला. केएल राहुलच्या तुफानी डावामुळे टीम इंडियाने 39.4 षटकांत 250 धावा पूर्ण केल्या. केएल राहुलने अवघ्या 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तर, श्रेयस अय्यरबरोबर अवघ्या 72 चेंडूत शतकी भागीदारी पूर्ण केली. अय्यरला केएल राहुलच्या वेगवान खेळीचा देखील फायदा झाला आणि त्याने पहिले एकदिवसीय शतकही पूर्ण केले.

वाचा-कोणत्या 2 खेळाडूंमुळे पराभूत झाली टीम इंडिया? कॅप्टन कोहलीने केला खुलासा

धोनीच्या परतीचे दरवाजे बंद!

केएल राहुलने सलग दुसर्‍या वन डे सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाज करत अर्धशतक ठोकले. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत राहुलने राजकोटमध्ये 52 चेंडूत 80 धावा केल्या. टीम इंडिया व्यवस्थापनाने केएल राहुलला फिनिशरची जबाबदारी दिली आहे, जी त्याने सलग दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये योग्य सिद्ध झाली. केएल राहुलचा फिनिशर म्हणून या दोन डावांमुळे एमएस धोनीच्या परतीचा मार्ग कायमचा थांबू शकतो. कारण केएल राहुलदेखील यष्टीरक्षण करत आहे आणि आता त्याला फिनिशरचीही भूमिका देण्यात आली आहे. केएल राहुल जर दोन्ही भूमिका साकारण्यात यशस्वी ठरला महेंद्रसिंग धोनीला संघात जागा मिळणे कठिण होईल, इतकेच नव्हे तर धोनीचा उत्तराधिकारी समजल्या जाणार्‍या ऋषभ पंतसाठीही राहुल हा धोका बनला आहे. त्याचबरोबर संजू सॅमसन, दिनेश कार्तिक, शिखर धवन यांचेही दरवाजे राहुलने जवळ जवळ बंद केले आहेत.

वाचा-विराटने ज्या मुंबईकराला संघाबाहेर काढलं त्यानेच रचला इतिहास! 605 धावा केल्यानंतर

First published: February 6, 2020, 9:58 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या