वर्ल्डकपआधी भारताचा ‘हा’ डॅशिंग खेळाडू डेट करतोय आलिया भटच्या बेस्ट फ्रेंडला

वर्ल्डकपआधी भारताचा ‘हा’ डॅशिंग खेळाडू डेट करतोय आलिया भटच्या बेस्ट फ्रेंडला

आलिया आणि आकांक्षा बालमैत्रीणी आहेत. त्या दोघांच्या फोटोची सोशल मीडियावर बरीच चर्चा असते.

  • Share this:

मुंबई, 28 मे : विश्वचषकाला अगदी काही तासांचा कालावधी उरला असताना, सर्व संघ जय्यत तयारी करित आहेत. भारतीय संघाने देखील आपल्या दोन सराव सामन्यातून आपली तयारी दाखवली आहे. दरम्यान बांगलादेश विरुद्धच्या सराव सामन्यात चर्चेचा विषय ठरला तो, केएल राहुल. राहुलनं विराटची चिंता मिटवत, चौथ्या क्रमांकावर धडाकेबाज फलंदाजी करत शतकी खेळी केली. दरम्यान या शतकी खेळीच्या जोरावर त्यानं आपलं संघातील स्थानही पक्कं केलं. मात्र, त्याच्या शतकानंतर सोशल मीडियावर भलतीच चर्चा रंगत आहे.

कॉफी विथ करण या कार्यक्रमात महिलांवर आक्षेपार्ह विधान केल्यामुळं राहुल आणि हार्दिक पांड्या यांना बीसीसीआयनं ऑस्ट्रेलिया दौऱ्या दरम्यान काही काळ सामन्यांपासून बंदी घातली होती. मात्र, त्यानंतर आयपीएलमध्ये राहुलनं चांगली फलंदाजी केली आणि त्याची निवड भारताच्या संभाव्य संघात झाली. मैदानावर विराट कोहलीसोबत चांगली भागीदारी करणारा राहुल मात्र मैदानाबाहेर वेगळ्याच रंगात दिसतो. त्याच्या डॅशींग अवतारामुळं तो नेहमीच चर्चेत असतो. मात्र आता त्याच्या नावाची चर्चा आहे ती, आलिया भट या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेस्ट फ्रेंडला डेट केल्यामुळं.

आलियाची खास मैत्रीण आकांक्षा रंजन कपूर ही सुध्दा सोशल मीडियावर चर्चेत असते. आलिया आणि आकांक्षा बालमैत्रीणी आहेत. त्या दोघांच्या फोटोची सोशल मीडियावर बरीच चर्चा असते. मात्र काही दिवसांपूर्वी आकांक्षानं राहुलसोबत इन्स्टाग्रामवर एक फोटो टाकला होता.

 

View this post on Instagram

 

...n i’m so good with that

A post shared by Kanch (@akansharanjankapoor) on

या फोटोनंतर त्यांच्या चर्चांना उधान आले. या फोटोमध्ये सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीही दिसत आहे. एवढचं नाही तर, हे दोघंही एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करत असतात.

आकांक्षा मॉडेल असून तिनं नुकतेच अभिनेता अपरीक्षित खुराना सोबत एका गाण्यांच्या व्हिडियोतून पदार्पण केले. दरम्यान आकांक्षाच्याआधी राहुलचे नाव अभिनेत्री निधी अग्रवाल हिच्यासोबत जोडण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

Out tomorrow! #TereDoNaina

A post shared by Kanch (@akansharanjankapoor) on

तर, आकांक्षा अविक चॅटर्जी नावाच्या व्यवसायिकासोबत रिलेशनशीपमध्ये होती. बॉलीवूड आणि क्रिकेट यांचे नाते तसे नेहमीच प्रेमाचे असते. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा असो किंवा युवराज सिंग आणि हेजल असो क्रिकेटर आणि अभिनेत्री यांच्या नावाच्या नेहमीच चर्चा असतात. आता केएल राहुल विश्वचषकात शतकी पारी खेळत असताना, त्याला चीअर करण्यासाठी आकांक्षा येणार का, हे येत्या काही दिवसांत कळेलच.

वाचा-World Cup : केएल राहुलच्या एका शतकामुळं होणार 'या' तीन खेळाडूंचा पत्ता कट

वाचा-….म्हणून तहान-भूक विसरून वर्ल्डकप खेळतोय साऊथ आफ्रिकेचा 'हा' फलंदाज

वाचा-IND vs BAN : विराटची चिंता मिटली, शतकी खेळीच्या जोरावर केएल राहुलनं संघातील स्थान केले फिक्स

VIDEO: 30 सेकंद उडणारं 3 ग्रॅम वजनाचं विमान तुम्ही पाहिलं आहे का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2019 11:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading