Home /News /sport /

केएल राहुलला वाढदिवसानिमित्त आथिया शेट्टीने दिल्या 'खास' शुभेच्छा, शेअर केला दोघांचा PHOTO

केएल राहुलला वाढदिवसानिमित्त आथिया शेट्टीने दिल्या 'खास' शुभेच्छा, शेअर केला दोघांचा PHOTO

भारताचा क्रिकेटपटू केएल राहुलच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टीने दोघांचा फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

  नवी दिल्ली, 18 एप्रिल : भारताचा क्रिकेटपटू केएल राहुल शनिवारी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त केएल राहुलला बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टीने खास शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं केएल राहुलसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. कॅप्शन देताना आथियाने लिहिलं की, 'हॅप्पी बर्थडे, माय पर्सन' .यासोबतच लव्ह इमोजीसुद्धा शेअर केल्या आहेत. आथियाने दिलेल्या या शुभेच्छांवर कमेंट करताना केएल राहुलनं तीन लव्ह इमोजी शेअर केले आहेत. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. आथिया शेट्टीच्या वाढदिवसाला केअल राहुलनेसुद्धा खास शुभेच्छा दिल्या होत्या. तसंच दोघांना याआधीही एकत्र पाहण्यात आलं होतं. दरम्यान, अजुनही दोघांनी याबाबत काहीही स्पष्ट केलेलं नाही. केएल राहुलनं आथिया शेट्टी सोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये बॉलिवूड फिल्म हेरा फेरीमधील एक सीन रिक्रिएट करण्यात आला होता.
  View this post on Instagram

  happy birthday, my person @rahulkl

  A post shared by Athiya Shetty (@athiyashetty) on

  केएल राहुलला बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटानेसुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. तिने केएल राहुलसोबतचा फोटो शेअर केला आहे. प्रीति झिंटा आयपीएलमध्ये टीम किंग्ज इलेव्हन पंजाबची सहमालक आहे आणि केएल राहुल पंजाबचा कर्णधार आहे.
  प्रीति झिंटाने केएल राहुलचा फोटो शेअर करताना म्हटलं की, वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुला खूप सारं प्रेम, आनंद आणि धावा मिळोत अशी प्रार्थना. नेहमी असाच हसत रहा केएल राहुल सध्या भारतीय संघात अनेक भूमिका पार पाडत आहे. न्यूझीलंड दौऱ्यात त्यानं फलंदाजीत तर कमाल केलीच पण त्याचसोबत यष्टीरक्षक म्हणूनही चांगली जबाबदारी पार पाडली होती. हे वाचा : सलमान की धोनी कोण आहे सर्वात मोठा सुपरस्टार? भारतीय क्रिकेटपटूने दिलं उत्तर
  Published by:Suraj Yadav
  First published:

  Tags: Cricket, Kl rahul

  पुढील बातम्या