मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

केएल राहुल-राशिद खानच्या डोक्यावर टांगती तलवार, IPL च्या 'या' दोन्ही संघानी BCCI कडे केली तक्रार

केएल राहुल-राशिद खानच्या डोक्यावर टांगती तलवार, IPL च्या 'या' दोन्ही संघानी BCCI कडे केली तक्रार

KL Rahul And Rashid Khan

KL Rahul And Rashid Khan

पंजाब किंग्स ( PBKS) व सनरायझर्स हैदराबादनं ( SRH) यांनी नव्या संघांविरोधात बीसीसीआयकडे(BCCI) तक्रार केली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर: आयपीएल 2022(IPL 2022 Retention) साठी 8 फ्रँचायझींना त्यांच्या ताफ्यातील चार खेळाडूंना कायम राखण्याची मुदत आज दुपारी 12 वाजता संपणार आहे. तत्पूर्वी, मोठी अपडेट समोर आली आहे. पंजाब किंग्स ( PBKS) व सनरायझर्स हैदराबादनं ( SRH) यांनी नव्या संघांविरोधात बीसीसीआयकडे(BCCI) तक्रार केली आहे. त्यामुळे, केएल राहुल-राशिद खान(KL Rahul And Rashid Khan) यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे.

आयपीएलच्या पुढील पर्वात दोन नवीन संघ दाखल होणार असल्यामुळे मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्यासाठी सध्या असलेल्या 8 फ्रँचायझींना प्रत्येकी 4 खेळाडूंनाच संघात कायम राखता येणार आहे. फ्रँचायझींनी त्यांची यादी बीसीसीआयकडे सुपूर्द केल्यानंतर अहमदाबाद व लखनौ फ्रँचायझींना रिलिज केलेल्या खेळाडूंमधून प्रत्येकी 3 जणांना मेग अॅक्शन पूर्वी करारबद्ध करता येणार आहे.

दरम्यान, नव्या संघाविरोधात पंजाब किंग्स ( PBKS) व सनरायझर्स हैदराबादनं ( SRH) बीसीसीआयकडे(BCCI) तक्रार केली असल्याची माहिती समोर आली आहे,

''नवीन फ्रेंचायझी राहुल आणि राशिद यांना त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सामील करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे त्यांच्या योजनांवर परिणाम होत आहे”, अशी पंजाब आणि हैदराबाद संघाने तक्रार केली आहे, इनसाइड स्पोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने याची माहिती दिली आहे.

''आम्हाला कोणतेही पत्र मिळालेले नाही, परंतु लखनऊ संघ खेळाडूंशी संपर्क करत असल्याची तोंडी तक्रार मिळाली आहे. आम्ही त्याची चौकशी करत असून त्यात तथ्य आढळल्यास योग्य ती कारवाई करू. संघांचा सध्याचा समतोल बिघडू नये. तीव्र स्पर्धेमध्ये हा प्रकार टाळला पाहिजे. सध्याच्या संघांनी खेळाडूंशी संपर्क साधणे योग्य नाही”, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

बीसीसीआयने तयार केलेल्या लिलावाच्या नियमांनुसार, दोन्ही नवीन फ्रेंचायझींना लिलावापूर्वी त्यांच्या आवडीचे दोन खेळाडू खरेदी करण्याचा पर्याय आहे, परंतु हा पर्याय ट्रेडिंग विंडो सुरू झाल्यानंतरच खुला होईल.

First published:

Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, Kl rahul, Punjab kings, SRH