Home /News /sport /

KL Rahul Athiya Shetty Marriage : राहुल-आथिया लवकरच करणार लग्न! मुहूर्तही ठरला

KL Rahul Athiya Shetty Marriage : राहुल-आथिया लवकरच करणार लग्न! मुहूर्तही ठरला

K L Rahul

K L Rahul

बॉलिवूडमध्ये लग्नाचा मोसम संपूर्ण वर्षभर सुरू राहणार आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टनंतर आता अभिनेत्री आथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि केएल राहुलदेखील (KL Rahul) लवकरच लग्न करणार असल्याचं वृत्त आहे.

    मुंबई, 20 एप्रिल : बॉलिवूडमध्ये लग्नाचा मोसम संपूर्ण वर्षभर सुरू राहणार आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टनंतर आता अभिनेत्री आथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि केएल राहुलदेखील (KL Rahul) लवकरच लग्न करणार असल्याचं वृत्त आहे. हे दोघं बराच काळ रिलेशनशीपमध्ये आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार हे दोघं यावर्षी थंडीमध्ये लग्न करू शकतात, यासाठीची तयारीही सुरू झाली आहे. पिंकव्हिलामध्ये आलेल्या वृत्तानुसार आथिया आणि राहुलचं लग्न दक्षिण भारतीय रिती रिवाजानुसार होईल. शेट्टी कुटुंबाच्या जवळ असलेल्या सूत्रांनी पिंकव्हिलाशी बोलताना ही माहिती दिली आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आहे, यानंतर वर्षाअखेरीस आलिया आणि राहुल लग्न करण्याची शक्यता आहे. आथियाचे वडील सुनिल शेट्टी यांचा जन्म मंगलोरियन तुलू कुटुंबात झाला आहे, तर केएल राहुलचा संबंधही मँगलोरशी आहे, त्यामुळे दोघांचं लग्न दक्षिण भारतीय पद्धतीने होईल. अजून दोन्ही कुटुंबांमधल्या कोणीही लग्नाबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. केएल राहुल आणि आथिया यांनी मागच्या वर्षी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर करत, त्यांचं रिलेशनशीप जाहीर केलं होतं. आथियादेखील केएल राहुलसोबतचे फोटो बरेच वेळा शेयर करते. केएल राहुलच्या 30व्या वाढदिवशी आथियाने राहुलसाठी खास फोस्ट लिहिली, त्यात तिने प्रेमाची कबुली दिली. केएल राहुलचं आथियाचा भाऊ अहान आणि वडील सुनिल शेट्टी यांच्यासोबतही चांगलं बॉण्डिंग आहे. केएल राहुल सध्या आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जाएंट्सचा कर्णधार आहे. राहुलला पाठिंबा देण्यासाठी आथिया आणि सुनिल शेट्टी स्टेडियममध्येही आले होते, यावेळी त्यांनी लखनऊच्या टीमची जर्सीही घातली होती.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Kl rahul

    पुढील बातम्या