माऊंट माउंगानुई, 11 फेब्रुवारी : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत शेवटच्या सामन्यात शतकी खेळी केली. भारताने सामन्यासह मालिका गमावली असली तरी केएल राहुलने यष्टीरक्षणाची जबाबदारी असताना फलंदाजीची छाप पाडली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ऋषभ पंत जखमी झाल्यानंतर केएल राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर टी20 आणि एकदिवसीय मालिकेत केएल राहुलने यष्टीरक्षण केलं. केएल राहुलने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून 6 सामने खेळले. यात त्यानं अशी कामगिरी केली जी आतापर्यंत धोनी, पंत, दिनेश कार्तिक यांना करता आली नाही.
धोनीने आतापर्यंत जवळपास 350 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यातील 297 डावात 10 हजार 773 धावा केल्या. यामध्ये धोनीने 10 शतकं साजरी केली. मात्र धोनीला आशियाबाहेर एकही शतक करता आलेलं नाही. त्याने विशाखापट्टणम, जयपूर, चेन्नई, कराची, नागपूर इथं दोन तर ढाका, मोहाली आणि कटक इथं एक शतक झळकावलं आहे. मात्र केएल राहुलने गेल्या महिन्यातच यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळायला सुरुवात केली.
राहुल द्रविडनंतर आशियाबाहेर शतकी खेळी करणारा केएल राहुल दुसरा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. राहुल द्रविडने 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये लंकेविरुद्ध टॉन्टनमध्ये 145 धावांची खेळी केली होती. केएल राहुलने 104 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. केएल राहुलचे एकदिवसीय क्रिकेटमधील हे चौथे शतक आहे. त्यानं 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले.
टी-20 मधले शेर वन-डेत ढेर! भारताचा 3-0ने लाजीरवाणा पराभव
केएल राहुल सुरैश रैनानंतर दुसरा खेळाडू ठरला आहे, ज्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन शतक पूर्ण केले. याआधी रैनाने 2015मध्ये अशी कामगिरी केली होती.
भारत-न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला लाजीरवाणा पराभव सहन करावा लागला. भारतानं अखेरचा सामनाही गमावत या मालिकेत क्लीन स्वीप मिळवला. न्यूझीलंडने 17 चेंडू राखत 5 विकेटनं हा सामना जिंकला. 30 वर्षांनंतर भारताला क्लीन स्वीप मिळाली आहे.
7 वर्षांनंतर विराटची फ्लॉप कामगिरी! ‘या’ आकड्यांनी केली कॅप्टन कोहलीची पोलखोल