Home /News /sport /

...6,6,6,6,6 KKRच्या खेळाडूने गाजवली बिग बॅश लीग, VIDEO

...6,6,6,6,6 KKRच्या खेळाडूने गाजवली बिग बॅश लीग, VIDEO

कोलकाता नाइट रायडर्सने इंग्लंडच्या टॉम बेंटनला एक कोटी रुपये मोजून संघात घेतलं आहे.

    नवी दिल्ली, 07 जानेवारी : इंग्लंड तडाखेबाज फलंदाज टॉम बेंटनने बिग बॅश लीगमध्ये 19 चेंडूत 56 धावांची वेगवान खेळी केली. लीगच्या इतिहासातील हे दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं. बीबीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 12 चेंडूत अर्धशतक केलं होतं. बेंटनने सोमवारी झालेल्या सामन्यात ब्रिस्बेन हीट संघाकडून खेळताना सिडनी थंडर्सविरुद्ध एका षटकात 5 षटकार मारण्याचा विक्रम केला. त्याने चौथ्या षटकात पहिला चेंडू वगळता उरलेल्या पाचही चेंडूवर षटकार मारला. हे षटक ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अर्जुन नायरने टाकले होते. यंदाच्या आयपीएल लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने 21 वर्षीय बेंटनला संघात घेतलं आहे. दोन वेळा आयपीएल जिंकलेल्या केकेआरने त्याच्यासाठी एक कोटी रुपये मोजले आहेत. बेंटनने सिडनी थंडर्सविरुद्ध सात षटकार आणि दोन चौकार मारले. त्याच्या या खेळीच्या जोरावर संघाने मोठी धावसंख्या उभारली. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला तरी आठ षटकात संघाने 4 बाद 119 धावा केल्या. अखेर संजू सॅमसनला मिळणार संधी? पंत नाही तर 'या' खेळाडूला विराट बसवणार बाहेर इंग्लंडकडून आतापर्यंत फक्त तीन आंतरराष्ट्रीय टी20 सामने बेंटनला खेळायला मिळाले आहेत. सलामीला खेळणाऱ्या बेंटनने तीन सामन्यात एकूण 56 धावा केल्या आहेत. गोलंदाजाची बॉलिंग पाहून घाबरला फलंदाज अन् टाकली विकेट, VIDEO VIRAL
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: IPL 2020

    पुढील बातम्या