News18 Lokmat

सामना KKR v/s SRHचा मात्र, शाहरुखच्या 'या' कृतीनं जिंकली सर्वांची मनं

कोलकाता आणि हैदराबाद सामना संपल्यावर शाहरुखनं कोलकाता नाईट रायडर्सचा खास चाहता हर्षुल गोएंकाची भेट घेतली.

Megha Jethe | News18 Lokmat | Updated On: Mar 25, 2019 04:38 PM IST

सामना KKR v/s SRHचा मात्र, शाहरुखच्या 'या' कृतीनं जिंकली सर्वांची मनं

कोलकाता, 25 मार्च : IPL 2019चा रणसंग्रामाला सुरुवात झाली असून रविवारी (24 मार्च) कोलकता आणि हैदराबाद यांच्यात रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात कोण जिंकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हैदराबादनं कोलकताला 182 धावांचे आव्हान दिले होते. डेव्हिड वॉर्नरच्या पुनरागमनामुळे हैदराबाद संघातील खेळाडूंचे मनोबल उंचावलेले पाहायला मिळत होते. एक वर्षानंतर संघात कमबॅक करणाऱ्या वॉर्नरनं 85 धावा केल्या होत्या. मात्र त्याचे प्रयत्न निष्फळ ठरवत आंद्रे रसेल या धडाकेबाज फलंदाजाच्या तुफान खेळीनंतर घरच्या मैदानावर कोलकताने हैदराबादवर 6 गडी राखून विजय मिळवला. पण यानंतर शाहरुख खानच्या एका कृतीनं मात्र सर्वांची मनं जिंकली.

कोलकाता आणि हैदराबाद सामना संपल्यावर शाहरुखनं कोलकाता नाईट रायडर्सचा खास चाहता हर्षुल गोएंकाची भेट घेतली. हर्षुल मागच्या काही वर्षांपासून सेरेब्रल पाल्सी या गंभीर आजाराशी झगडत आणि मात्र 2014 पासून त्यानं केकेआरचा ईडन गार्डनवर झालेला एकही सामना चुकवलेला नाही. मागच्या वर्षी देखील शाहरुखनं हर्षुलची भेट घेतली होती तसेच त्याच्यासोबत फोटोही काढला होता. यावेळी शाहरुखनं त्याची भेट घेतली तेव्हाचा व्हिडीओ केकेआरच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये शाहरुख भेटल्यावर झालेला आनंद हर्षुलच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.


Loading...


हर्षुल नेहमी ज्या स्पिरीटनं कोलकाता संघाला प्रोत्साहन देण्यासाठी हजर असतो ते स्पिरीट पाहून मी भारावून गेलो असं क्रिकेटर दिनेश कार्तिकनं सांगितलं. तर सुवातीला केकेआरचा एक भाग असलेला क्रिकेटर गौतम गंभीर हर्षुल दिल्ली डेअर डेव्हिल्सचा चाहता बनवा यासाठी त्याचं मन वळवण्याच्या तयारीत आहे. गौतम गंभीरनं हर्षुलच्या फोटोंचं कोलाज पोस्ट करत हर्षुलनं दिल्लीचा चाहता बनावं अशा आशयाचं एक गमतीशीर ट्विटही केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2019 04:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...