Home /News /sport /

'Shreyas Iyer तू माझ्याशी लग्न करशील का?' तरुणीने भर मैदानात KKRच्या कॅप्टनला केले प्रपोज

'Shreyas Iyer तू माझ्याशी लग्न करशील का?' तरुणीने भर मैदानात KKRच्या कॅप्टनला केले प्रपोज

shreyas iyer)

shreyas iyer)

आयपीएलमधील 30 (IPL2022) वा सामना कोलकाता विरुद्ध राजस्थान या टीममध्ये खेळवण्यात आला. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही टीममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. सोमवारी राजस्थाननं कोलकातावर रोमांचक विजय मिळवला. मात्र, चर्चा क्रिकेट जगतात चर्चा सध्या केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरचीच (shreyas iyer) पाहायला मिळत आहे. यामागचे कारणही तसेच आहे. भर मैदानात तरुणीने श्रेयसला लग्नाची मागणी घातली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 19 एप्रिल: आयपीएलमधील 30 (IPL2022) वा सामना कोलकाता विरुद्ध राजस्थान या टीममध्ये खेळवण्यात आला. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही टीममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. सोमवारी राजस्थाननं कोलकातावर रोमांचक विजय मिळवला. मात्र, चर्चा क्रिकेट जगतात चर्चा सध्या केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरचीच (shreyas iyer) पाहायला मिळत आहे. यामागचे कारणही तसेच आहे. भर मैदानात तरुणीने श्रेयसला लग्नाची मागणी घातली आहे. आपल्या आवडत्या टीमला आणि आपल्या आवडत्या खेळाडूला चिअर करण्यासाठी अनेक चाहते मैदानावर उपस्थिती लावतात. कॅमेराचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी चाहते अनेक करामतीही करत असतात. सध्या एका तरुणीचा असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्सदरम्यान (RR) मॅच खेळवण्यात आली. या सामन्यासाठी तरुणी केकेआरच्या कॅप्टनसाठी खास पोस्टर घेऊन स्टेडिअमवर पोहचली. या पोस्टरने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. ही मुलगी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) प्रचंड फॅन आहे. विशेष म्हणजे तिला श्रेयस अय्यरशी लग्न करायचं आहे. माझ्या आईने मला मुलगा शोधायला सांगितलं आहे, श्रेयस अय्यर तू माझ्याशी लग्न करशील का? असे तिने आणल्या पोस्टरवर लिहण्यात आले होते. सोशल मीडियावर हे पोस्टर चांगलंच व्हायरल होत असून केकेआरनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवर या मुलीचा पोस्टरसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे सध्या श्रेयस अय्यर आणि तरुणीने केलेल्या लग्नाच्या मागणीची चर्चा अधिक रंगली आहे. अय्यर आहे या अभिनेत्रीच्या प्रेमात श्रेयस अय्यरला अभिनेत्री म्हणून स्कारलेट जोहानसन आवडते. स्कारलेट ही एक प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री आहे. स्कारलेटशिवाय भारतीय क्रिकेटर श्रेयस अय्यरला जेसिका अल्बा आणि भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोण आवडतात. श्रेयस अय्यर देखील एक संगीत प्रेमी आहे आणि त्याला लिल वेन आणि एमिनेम आवडतात. आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर (Rajasthan Royals vs KKR) 7 रननी रोमांचक विजय मिळवला आहे. या विजयात राजस्थानच्या बॉलर्सनी चांगलेच मैदान गाजवले.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Ipl 2022, KKR, Rajasthan Royals

    पुढील बातम्या