कार्तिकची चूक केकेआरला पडली खूप महागात

..तर विराटसेनेवर कोलकाताने सहज विजय मिळवला असता.

News18 Lokmat | Updated On: Apr 20, 2019 11:09 AM IST

कार्तिकची चूक केकेआरला पडली खूप महागात

कोलकाता, 20 एप्रिल : क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंकडून झालेली एखादी चूक सामन्यात खूप महागात पडू शकते. आरसीबीविरुद्ध खेळताना केकेआरच्या संघाची चूक विराट सेनेच्या पथ्य्यावर पडली. रॉयल चॅलेंजर्स फलंदाजी करत असताना अकराव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर फलंदाजाच्या बॅटला घासून गेलेला चेंडू यष्टीरक्षकाने झेलला तरीही बाद देण्यात आलं नाही.

वाचा : IPL 2019 : शतकासाठी स्वार्थी झाला विराट, संघापेक्षा शतक महत्त्वाचे?

आरसीबीचा फलंदाज मोइन अली खेळत असताना आंद्रे रसेल अकरावं षटक टाकले. यावेळी शेवटच्या चेंडूवर अलीच्या बॅटला घासून गेलेला चेंडू कार्तिकने झेलला. मात्र यावर ना रसेलनं अपील केलं ना कार्तिकनं. याकडे पंचांनीही लक्ष दिलं नाही. मात्र, अल्ट्रा एजमध्ये चेंडू बॅटला लागल्याचे स्पष्ट दिसत होते.

मोइन अलीला मिळालेलं जीवदान केकेआरला महागात पडलं. अलीने फक्त 24 चेंडूत अर्धशतक केलं. त्याने 28 चेंडूत 66 धावांची तुफान खेळी केली. त्याला जीवदान मिळाले तेव्हा तो 9 धावांवर खेळत होता. अलीने विराटसोबत 43 चेंडूत 90 धावांची भागिदारी केली.

विराट आणि मोइन अलीच्या खेळीच्या जोरावर आरसीबीने कोलाकातासमोर 218 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरला 10 धावा कमी पडल्या जर मोइन अलीला जीवदान मिळालं नसतं तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा असता.

Loading...

रावसाहेब दानवे माझी मेहबूबा, प्रचारसभेत नेत्याच्या वक्तव्याने हशा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 20, 2019 11:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...