IPL 2019 : गेल फेल तर रसेल हिट, किंग्जचा नाईट रायडर्सकडून पराभव

कोलकताकडून पंजाबचा 28 धावांनी पराभव. रसेलला मिळालेलं जीवनदान अश्विनवर पडलं भारी.

News18 Lokmat | Updated On: Mar 27, 2019 11:47 PM IST

IPL 2019 : गेल फेल तर रसेल हिट, किंग्जचा नाईट रायडर्सकडून पराभव

कोलकाता, 27 मार्च : कोलकता आणि पंजाब यांच्यातला सामना हा हायवोल्टेज ठरला. कोलकतानं प्रथम फलंदाजी करत पंजाबसमोर 219 धावांचे आव्हान ठेवले. मात्र पंजाबला 28 धावांनी पराभव स्विकारावा लागला. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरूवात निराशाजनक झाली. केएल राहूल केवळ एक धाव करत बाद झाला तर. गेललाही चांगली फलंदाजी करता आली नाही. मात्र, त्यानंतर मयंक अग्रवालनं आक्रमक फलंदाजी करत 58 धावा केल्या. डेव्हिड मिलर आणि मनदीप सिंग यांनी 56 धावांची भागीदारी करत, काही काळं पंजाबचा पराभव लांबवला.Loading...

दरम्यान, प्रथम फलंदाजी करत, रसेलच्या वादळापुढं पंजाबचे गोलंदाज उद्धस्त झाले.रसेलनं शेवटच्या तीन ओव्हरमध्ये तुफान फलंदाजी करत, कोलकताला 200चा आकडा पार करून दिला. रसेलनं या सामन्यातही केवळ 17 चेंडूत 48 धावा केल्या. तर, त्याला साथ देत रॉबीन उथप्पानही चांगली फलंदाजी केली. ईडन गार्डनचा स्टेडियम फलंदाजांसाठी पुरक असताना, अश्विननं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याच्या शेवटच्या तीन षटकांत आंद्रे रसेल आणि रॉबीन उथप्पा यांनी आक्रमक फलंदाजी करत पंजाब समोर आव्हान ठेवले.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब संघानं सलामी फलंदाजांना स्वस्तात बाद केलं. क्रिस लिन 10 धावा करत बाद झाला, तर पंजासाठी धोकादायक असणारा धडाकेबाज फलंदाज सुनील नारायण केवळ 24 धावा करत बाद झाला. मात्र, त्याच्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉबीन उथप्पा आणि नितीश राणा यांनी आक्रमक फलंदाजी केली. राणानं 34 चेंडूत सात षटकार ठोकत 63 धावा केल्या.तर अश्विननं घेतलेला प्रथम गोलंदाजीचा निर्णय त्याला काहीसा महागात पडला. पहिल्याच सामन्यात पर्दापण करणारा वरुण चक्रवर्ती महागात पडला, त्यानं 11.34च्या सरासरीनं 35 धावा दिल्या, मात्र नितीश राणाची मोठी विकेट त्याने घेतली. तर, कोलकताकडून रसेलनं दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या.कोलकताच्या या लगातार दुसऱ्या विजयामुळं कोलकता नाइट रायडर्सचा मालक शाहरुख खान नक्कीच खुश असणार आहे.


POINTS TABLE:SCHEDULE TIME TABLE:ORANGE CAP:PURPLE CAP:RESULTS TABLE:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2019 07:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...