रैनाने केली 'रायडर्स'ची दैना, कोलकाताला 4 विकेटसने हरवलं

रैनाने केली 'रायडर्स'ची दैना, कोलकाताला 4 विकेटसने हरवलं

  • Share this:

21 एप्रिल : आयपीएलच्या दहावा सिझनमध्ये गुजरात लायन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर शानदार विजय मिळवला. कॅप्टन सुरेश रैनाने कॅप्टन इनिंग पेश करत 4 गडी राखून विजय मिळवला.

गुजरात लायन्सने टाॅस जिंकुन पहिली बाॅलिंगचा निर्णय घेतला. पहिली बॅटिंग करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने  पाच विकेट गमावून गुजरात लायन्ससमोर विजयासाठी १८८ रन्सचं आव्हान ठेवले होते. सुनील नरेननं तडाखेबाज बॅटिंग केली. 17 चेंडूत 9 चौकार आणि 1 सिक्स लगावत 42 रन्स ठोकले. मात्र, नरेन आऊट झाल्यानंतर  गौतम गंभीरही 33 आऊट झाला. आणि त्यानंतर राॅबीन उथप्पाने वादळी इनिंग पेश करत 48 चेंडूत 72 धावा ठोकल्या. 188 रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरातने सावध सुरुवात केली. आरोन फ्रिंच 31 तर ब्रँड मॅक्लुमने 33 रन्स करून आऊट झाले. त्यानंतर कॅप्टन सुरेश रैनाने 46 चेंडूत 84 रन्स करत टीमला विजय मिळवून दिला.

First published: April 22, 2017, 12:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading