नवी दिल्ली, 9 जानेवारी: इंडियन प्रिमियर लिगची फ्रँचायझी (IPL Franchise) असणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) रविवारी चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला (Mahendra Singh Dhoni) ट्रोल (Troll) करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सीएसकेचे फॅन्स चांगलेच चवचाळले आणि त्यांनी केकेआरला सडेतोड उत्तर द्यायला सुुरुवात केली. धोनीसोबत त्याचा मित्र आणि सहकारी रवींद्र जडेजादेखील आला आणि त्यानं केकेआरला ‘करारा जवाब’ दिला.
That moment when a classic move in Test cricket actually reminds you of a T20 master stroke! #Ashes #KKR #AmiKKR #AUSvENG pic.twitter.com/D3XbMu83mf
— KolkataKnightRiders (@KKRiders) January 9, 2022
… हा आहे रेफरन्स
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि शेवटच्या टेस्ट सामन्यात अखेरच्या षटकांमध्ये चांगलाच थरार रंगला होता. शेवटच्या दोन ओव्हर्स उरल्या असताना नेथल लियॉनला बॉलिंग देण्यात आली आणि सर्व खेळाडू बॅट्समनच्या अगदी जवळजवळ उभे करण्यात आले. बॅट्समनच्या बॅटचा कोपरा लागून चेंडू हवेत उडालाच, तर त्याला कॅचआऊट करून मॅच जिंकता यावी, हा त्यामागचा हेतू होता. मात्र याचा काहीच फायदा झाला नाही आणि पाहुण्या ब्रिटीश संघाने सामना ड्रॉ करण्यात यश मिळवलं.
Its not a master stroke!Just a show off
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) January 9, 2022
केकेआरला आली 2016 ची आठवण
टेस्टमधील हा प्रसंग पाहून कोलकाता नाईट रायडर्सनं 2016 च्या एका सामन्याची आठवण आल्याचं म्हटलं. केकेआर आणि पुणे यांच्यात खेळल्या गेेलेल्या या सामन्यात कॅप्टन गौतम गंभीरनं सुपरजाएंट्सचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीसाठी अशीच फिल्डिंग लावली होती.
The same moment you forgot about what happened on last year finals #CSKvKKR, have some common sense while you are in commanding position pic.twitter.com/kgZL79kZyk
— Alex Dhoni (@alex_dhoni) January 9, 2022
त्यावेळी धोनी अत्यंत खराब फॉर्ममधून चालला होता आणि लेग स्पिन बॉलर सहजपणे त्याची विकेट काढत असल्याचं चित्र होतं. त्यावेळी धोनीसाठी लावलेल्या फिल्डिंगची आपल्याला आठवण झाल्याचं केकेआरनं म्हटलं. त्यावरून धोनीचे चाहते त्यांच्यावर जोरदार तुटून पडले.
हे वाचा-
जडेजानंही दिलं प्रत्युत्तर
‘टेस्ट क्रिकेटची ही मास्टर चाल जी आपल्याला टी-20 चीही आठवण करून देते’, असं म्हणत केकेआरनं केलेल्या ट्विटला उत्तर देण्यासाठी चेन्नई संघाचा प्लेअर आणि धोनीचा मित्र जडेजाही धावून आला. ‘हा काही मास्टर स्ट्रोक नाही. हा केवळ दिखावा आहे’, असं उत्तर त्यानं केकेआरला दिलं. त्याशिवाय धोनीच्या फॅन्सनीही केकेआरवर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली.
अर्थात, त्या सामन्यात पुण्याच्या संघाचा पराभव झाला होता. मात्र महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जनं आतापर्यंत चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Csk, England, KKR, MS Dhoni, Social media troll, Sports