मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: दिल्लीविरुद्धच्या सामन्यापूर्वी KKR ला मोठा झटका, अचानक मायदेशी परतला ‘मॅच विनर’

IPL 2021: दिल्लीविरुद्धच्या सामन्यापूर्वी KKR ला मोठा झटका, अचानक मायदेशी परतला ‘मॅच विनर’

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाला (Big shock to KKR in IPL) मोठा झटका बसला आहे.

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाला (Big shock to KKR in IPL) मोठा झटका बसला आहे.

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाला (Big shock to KKR in IPL) मोठा झटका बसला आहे.

मुंबई, 27 सप्टेंबर : आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाला (Big shock to KKR in IPL) मोठा झटका बसला आहे. KKR चा डावखुरा स्पीनर कुलदीप यादवच्या गुडघ्याला गंभीर (Kuldeep Yadav injured and returned to India) दुखापत झाल्यामुळे तो युएईतून भारतात परत आला आहे. यानंतरच्या रणजी मालिकेतही तो खेळण्याची शक्यता कमी असून या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला काही आठवड्यांचा वेळ लागण्याची शक्यता आहे.

प्रॅक्टिस करताना झाली दुखापत

आयपीएलच्या आगामी सामन्यांमध्ये तो सहभागी होण्याची कुठलीही शक्यता नसल्यामुळेच त्याला भारतात परत पाठवण्यात आल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रॅक्टिसदरम्यान कुलदीपचा गुडघा मुरगळला आणि त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळेच तो भारतात परतल्याचं सांगण्यात येत आहे.

पूर्ण सीजनमधून बाहेर

इथून पुढच्या पूर्ण सीजनमध्ये कुलदीप यादव खेळण्याची कुठलीही शक्यता नसल्यामुळेच त्याला परत पाठवल्याचं बीसीसीआयनं सांगितलं आहे. यादववर मुंबईत शस्त्रक्रिया झाली असून त्याला बरं व्हायला 4 ते 6 महिन्यांचा वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रणजी ट्रॉफी खेळण्याची शक्यताही कमी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुडघ्याची दुखापत ही गंभीर स्वरुपाची असते. त्यातून बरं व्हायला अनेक दिवसांचा वेळ लागतो. सुरुवातीला फिजिओथेरपी, त्यानंतर सौम्य स्वरुपाची प्रॅक्टिस, मग नेट सेशन अशी दीर्घ आणि वेळखाऊ प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे रणजी ट्रॉफीचे सामने सुरु होईपर्यंत कुलदीप या दुखापतीतून बरा होईलच, असं खात्रीशीरपणे सांगता येत नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

कुलदीप मायदेशी

ट्विटरवर कुलदीप यादवनं नुकताच एक फोटो शेअर केला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य कोच ब्रँडन मॅक्युलम यांच्यासोबतचा फोटो ट्विट करत त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत कुलदीप त्यांच्यासोबत दिसत असला तरी हा जुना फोटो असल्याचं सूत्रांचं म्हणणं असून तो भारतातच असल्याची माहिती आहे.

हे वाचा -

सिडनीत केली होती कमाल

दोन वर्षांपूर्वी कुलदीप यादवने सिडनीत 5 विकेट घेत कमाल केली होती. त्यानंतर त्याच्या करिअरमध्ये उतार-चढाव सुरूच आहेत. तत्कालीन कोच रवी शास्त्रींनी भारताचा सध्याचा नंबर 1 चा स्पीनर असं म्हणत, त्याचा गौरव केला होता. मात्र 2019 नंतर त्याचा फॉर्म हरवला असून अनेकदा त्याच्या जागी संघात इतर खेळाडूंना स्थान दिलं जात असल्याचं चित्र आहे.

First published:

Tags: IPL 2021, KKR, Kuldeep yadav