IPL 2019 : ...आणि रसेलनं KKRसाठी आपलं करिअर पणाला लावलं

IPL 2019 : ...आणि रसेलनं KKRसाठी आपलं करिअर पणाला लावलं

या संघानं आतापर्यंत 10 सामन्यातील केवळ 4 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत KKR 6व्या स्थानावर आहे.

  • Share this:

हैदराबाद, 21 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाचं प्रदर्शन म्हणाव तस चांगल राहिलेलं नाही. दोन वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या या संघानं आतापर्यंत 10 सामन्यातील केवळ 4 सामने जिंकले आहेत.

कोलकाताकडून केवळ एकच खेळाडू लढतोय. याच खेळाडूच्या जीवावर कोलकातानं 4 सामने जिंकले आहेत. तो खेळाडू आहे वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज आंद्रे रसेल. रसेलनं आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे 39 षटकार लगावले आहेत. रसेल हा एकमेव असा फलंदाज आहे, जो 200च्या सरासरीनं फलंदाजी करतो. पण या सगळ्यानंतरही त्याच्या संघाला पराभव स्विकारावा लगतो. रसेल सध्या दुखापतग्रस्त असूनही तो आपल्या संघासाठी खेळत आहे, त्यामागे हे आहे यामगचं कटु सत्य.

आंद्रे रसेल अनफिट

कोलकाता संघाचा ऑलराऊंडर खेळाडू आंद्रे रसेल सध्या चांगल्या फॉर्मात असला तरी, तो अनफिट आहे. त्याच्या पायाच्या स्नायूंचा त्रास होत आहे. बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला होता. तरी, त्यानं फलंदाजी केली होती. आणि 25 चेंडूत 65 धावांची तुफानी खेळी केली. मात्र, सलामी किंवा मधल्या फळीतील एकही फलंदाज चांगली कामगिरी करु शकला नाही, म्हणून कोलकाताला या सामन्यातही पराभव स्विकारावा लागला.

हैदराबाद विरोधात कोलकाताच्या संघानं दुखापतग्रस्त असलेल्या रसेलला आपल्या संघात सामिल केलं. सामन्याआधीच सराव करताना पायाला पट्टी बांधून रसेल मैदानात उतरताना दिसला. त्याच्या पायाची दुखापत अजूनही बरी झालेली नाही. मात्र रसेल वगळता कोलकाताकडं कोणताच चांगला फलंदाज नसल्यामुळं रसेलला मैदानात उतरावच लागलं. आजच्या सामन्यात त्याला केवळ 15 धावा करता आल्या. मात्र, या सामन्यातही संघाला पराभव स्विकारावा लागला.

आयपीएलमधलं रसेलचं वादळ

आंद्रे रसेलनं आयपीएलच्या या हंगामात 8 सामने खेळला आहे. ज्यात 39 षटकार मारण्याचा पराक्रमच जणु त्यानं केला आहे. एवढच नाही तर, कोलकातासाठी 100 षटकार मारणारा तो एकमेव फलंदाज आहे. रसेलनं आतापर्यंत 353 धावा केल्या आहेत.

दरम्यान आजच्या सामन्यात रसेलला सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. दरम्यान रसेलच्या वादळाची भीती असताना, रसेलला बाद करण्यात हैदराबादच्या संघाला यश आलं. रसेल केवळ 15 धावा करत बाद झाला.

तर, काहींनी कार्तिकच्या या निर्णयावर टीका केली. रसेलच्या आक्रमक फलंदाजाला मागे ठेवणचं कोलकाताला नडलं, अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली.

हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात कोलकाताला सपशेल पराभव सहन करावा लागला. हैदराबादनं कोलकाताचं 160 धावांचे आव्हान 15 ओव्हरमध्येच पुर्ण केलं. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या दोघांनी पॉवर प्लेमध्येच 72 धाव चोपून काढल्या. या जोडीने शतकी भागीदारी करताना आयपीएलमध्ये एका विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलमधील या दोघांची ही चौथी शतकी भागीदारी आहे.

VIDEO : राहुल गांधींवर टीका करताना पंकजा मुंडेंची जीभ घसरली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 07:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading