Home /News /sport /

स्वामी विवेकानंद खरंच क्रिकेट खेळले? किर्ती आझादनी शेयर केलेल्या Photo चे सत्य

स्वामी विवेकानंद खरंच क्रिकेट खेळले? किर्ती आझादनी शेयर केलेल्या Photo चे सत्य

किर्ती आझाद (Kirti Azad) यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला. तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते असलेल्या आझाद यांनी शेयर केलेल्या फोटोमध्ये स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) क्रिकेट खेळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

    मुंबई, 18 डिसेंबर : 1983 वनडे वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवणाऱ्या भारतीय टीममध्ये असलेल्या किर्ती आझाद (Kirti Azad) यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला. तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते असलेल्या आझाद यांनी शेयर केलेल्या फोटोमध्ये स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) क्रिकेट खेळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा फोटो कोलकात्याचं ऐतिहासिक स्टेडियम ईडन गार्डनचं असल्याचं सांगण्यात आलं आहे. किर्ती आझाद यांनी शेयर केलेला हा फोटो फेक (Fake Photo) असल्याचं समोर आलं आहे, यानंतर यूजर्सनी किर्ती आझाद यांच्यावर निशाणा साधला. 'कुणाला हे माहिती होतं? शानदार व्यक्तीला ऍक्शनमध्ये बघून किती शानदार वाटतं,' असं कॅप्शन किर्ती आझाद यांनी या फोटोला दिलं. या फोटोमध्ये स्वामी विवेकानंद बॉलिग करताना दिसत आहेत, पण हा फोटो फोटोशॉप आहे. या फोटोच्या खाली खोटी माहितीही देण्यात आली आहे. 'हा 1880 च्या आसपासचा काळ आहे, जेव्हा ईडन गार्डन 20 वर्ष जुनं होतं, त्यावेळी कोलकाता क्रिकेट क्लब आणि टाऊन क्लबमध्ये मॅच होत होती. नरेंद्रनाद दत्तनी त्या सामन्यात 7 विकेट घेतल्या. पुढे त्यांनी क्रिकेट खेळलं नाही, पण यानंतर जगाने त्यांना स्वामी विवेकानंद नावाने ओळखायला सुरुवात केली,' असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. किर्ती आझाद यांनी शेयर केलेल्या या फोटोचं सत्य लवकरच समोर आलं. एका यूजरने याचा खरा फोटो पोस्ट केला. हा फोटो हेडली वेरायटी यांचा आहे, जे इंग्लंडचा काऊंटी क्लब यॉर्कशायरकडून खेळायचे, हा फोटो 1940 सालचा आहे, असं या यूजरने सांगितलं. यूजर्सनी टीका केल्यानंतर किर्ती आझाद यांनी आपली चूक सुधारली, पण स्वामी विवेकानंद क्रिकेट खेळायचे असा दावा त्यांनी केला. एका रिपोर्टनुसार स्वामी विवेकानंद यांनी टाऊन क्लबकडून खेळताना 20 रन देऊन 7 विकेट घेतल्या होत्या. विवेकानंद यांनी हा सामना कोलकाता क्रिकेट क्लबविरुद्ध खेळल्याचंही सांगितलं जातं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या