मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

कॅप्टन्सीचं सगळ्यात मोठं वादळ पाहणाराचं म्हणतो, 'विराटचं रोहितला एक दिवस कर्णधारपद देईल'

कॅप्टन्सीचं सगळ्यात मोठं वादळ पाहणाराचं म्हणतो, 'विराटचं रोहितला एक दिवस कर्णधारपद देईल'

रोहित शर्माने (Rohit Sharma) टीम इंडियाचं (Team India) कर्णधार व्हावं, ही मागणी काही नवीन नाही. विराट कोहलीऐवजी (Virat Kohli) रोहित शर्माला वनडे आणि टी-20 टीमचं नेतृत्व द्यावं, असं वारंवार बोललं जातं.

रोहित शर्माने (Rohit Sharma) टीम इंडियाचं (Team India) कर्णधार व्हावं, ही मागणी काही नवीन नाही. विराट कोहलीऐवजी (Virat Kohli) रोहित शर्माला वनडे आणि टी-20 टीमचं नेतृत्व द्यावं, असं वारंवार बोललं जातं.

रोहित शर्माने (Rohit Sharma) टीम इंडियाचं (Team India) कर्णधार व्हावं, ही मागणी काही नवीन नाही. विराट कोहलीऐवजी (Virat Kohli) रोहित शर्माला वनडे आणि टी-20 टीमचं नेतृत्व द्यावं, असं वारंवार बोललं जातं.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 29 मे : रोहित शर्माने (Rohit Sharma) टीम इंडियाचं (Team India) कर्णधार व्हावं, ही मागणी काही नवीन नाही. आयपीएलमध्ये (IPL) सर्वाधिक ट्रॉफी जिंकणाऱ्या रोहितच्या नेतृत्वाच्या गुणांचं सगळेच कौतुक करतात. पण टीम इंडियाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे (Kiran More) यांनी मात्र वेगळंच वक्तव्य केलं आहे. आपल्या कामाचा ताण कमी करण्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) स्वत:च रोहितला वनडे आणि टी-20 चं नेतृत्व देईल, असं भाकीत किरण मोरे यांनी केलं आहे. एका टीव्ही चॅनलसोबत बोलताना किरण मोरे यांनी हे वक्तव्य केलं.

किरण मोरे निवड समिती अध्यक्ष असतानाच भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कॅपटन्सीचा सगळ्यात मोठा वाद झाला होता. सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) कर्णधारपदावरून हटवण्यात टीम इंडियाचे तेव्हाचे प्रशिक्षक ग्रेग चॅपल (Gregg Chappell) यांच्यासोबतच किरण मोरे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगितलं जातं.

एका कालावधीनंतर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीमचं नेतृत्व करणं कठीण होऊन जातं. कोहली माजी कर्णधार एमएस धोनीसोबत (MS Dhoni) खेळला आहे, त्यामुळे तो धोनीकडून ताण कमी करण्याचं शिकेल, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलनंतर स्थिती स्पष्ट होईल, असं मोरे म्हणाले.

धोनीने क्रिकेटचा ताण कमी करण्यासाठी 2014 साली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि विराटला टीमचं नेतृत्व दिलं, पण धोनीने वनडे आणि टी-20 क्रिकेटचं कर्णधारपद स्वत:कडे ठेवलं. 2018 साली धोनीने वनडे आणि टी-20 क्रिकेटचं नेतृत्वही सोडून दिलं, पण 2019 वर्ल्ड कपपर्यंत धोनी खेळत राहिला. धोनी 2019 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध अखेरची मॅच खेळला. यानंतर मागच्या वर्षी 15 ऑगस्टला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

विराट कोहली टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. विराटच्या नेतृत्वात भारताने 60 टेस्ट खेळल्या, यापैकी 36 मॅचमध्ये भारताचा विजय झाला, तर 14 मॅच भारताने हरल्या. धोनी कर्णधार असताना भारताने 27 मॅच जिंकल्या. यानंतर सौरव गांगुलीने 21 विजय आणि मोहम्मद अझरुद्दीनने 14 विजय मिळवले. घरच्या मैदानातही विराट सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. भारतात विराटने 30 टेस्टमध्ये नेतृत्व केलं, यात 23 मॅचमध्ये विजय झाला. तर परदेशातही विराटच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक 13 टेस्ट जिंकल्या.

वनडे मॅचमध्ये रोहितची विजयी टक्केवारी विराटपेक्षा जास्त आहे. कोहलीने 95 वनडेमध्ये भारताचं नेतृत्व केलं, यातल्या 65 मॅचमध्ये विजय आणि 27 मॅचमध्ये पराभव झाला. विराटची विजयाची टक्केवारी 70.43 टक्के आहे. तर रोहितने 2017-2019 या कालावधीमध्ये 10 मॅचमध्ये कॅप्टन्सी केली, यातल्या 8 मॅच भारताने जिंकल्या आणि 2 मध्ये पराभव झाला. रोहितची विजयी टक्केवारी 80 टक्के एवढी आहे.

दुसरीकडे रोहित शर्मा आयपीएलमधलाही सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली. रोहितनंतर धोनीने चेन्नईला तीनवेळा चॅम्पियन बनवलं. विराट कोहलीला अजून एकदाही बँगलोरला आयपीएल जिंकवून देता आली नाही.

First published:

Tags: Cricket news, Rohit sharma, Team india, Virat kohli