मुंबई इंडियन्सचा पंजाबवर 8 गडी राखून विजय

मुंबई इंडियन्सचा पंजाबवर 8 गडी राखून विजय

बटलर आणि नितीश राणाच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने पंजाबवर 8 विकेट्सने विजय मिळवला

  • Share this:

20 एप्रिल : जोश बटलर आणि नितीश राणाच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने पंजाबवर 8 विकेट्सने विजय मिळवला.

आयपीएलच्या 22 मॅचमध्ये पंजाबने पहिली बॅटिंग करत 198 रन्सचा टप्पा गाठला. हाशिम आमलाने तडाखेबाज बॅटिंग करत सेंच्युरी झळकावली. 60 बाॅल्समध्ये 8 चौकार आणि 6 सिक्स लगावत आमलाने 104 रन्सची शानदार खेळी केली. त्यासोबतच कॅप्टन मॅक्सवेलने अवघ्या 18 चेंडून 40 रन्सची करून पाया भक्कम केला.

199 रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सनेही जशाच तसे उत्तर दिले. जोस बटलरने सात चौकार आणि पाच सिक्सर लगावत 77 रन्स ठोकले. तर तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या नितीश राणाने 6 सिक्स लगावत 62 रन्सची खेळी केली. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी पंजाबच्या बाॅलरचा पळताभुई करून सोडला. एकट्या ईशांत शर्माला 4 ओव्हर्समध्ये 58 रन्सची लूट केली.

First published: April 20, 2017, 11:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading