IPL 2019 : पंजाब संघाने दाखवली सामाजिक बांधिलकी, CRPF जवानांच्या कुटुंबीयांना केली मदत

IPL 2019 : पंजाब संघाने दाखवली सामाजिक बांधिलकी, CRPF जवानांच्या कुटुंबीयांना केली मदत

किंग्ज इलेव्हन पंजाब टीमचा कर्णधार रविश्चंद्र अश्विन आणि सीआरपीएफ उपमहानिरीक्षक व्ही. के. कौंदल यांच्या उपस्थितीत ही आर्थिक मदत देण्यात आली.

  • Share this:

चंदीगड, 20 मार्च : आयपीएलकरिता अवघे दोन दिवस उरले असताना, सगळे संघ आता सरावाकरिता सज्ज आहेत. यंदाच्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने सर्वात महागडा खेळाडू खरेदी केला होता. त्यामुळे या संघाकडे विशेष लक्ष असतानाच, पंजाबच्या संघाने पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले होते. त्यातील पाच जवान हे पंजाब-हिमाचलमधील होते. किंग्ज इलेव्हन पंजाब टीमचा कर्णधार रविंद्र अश्विन आणि सीआरपीएफ उपमहानिरीक्षक व्ही. के. कौंदल यांच्या उपस्थितीत ही आर्थिक मदत देण्यात आली. शहीद सीआरपीएफ जयमल सिंग, सुखजिंदर सिंग, मनिंदर सिंग, कुलविंदर सिंग आणि तिलक राज यांच्या कुटुंबांच्या सदस्यांकडे त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात आली. त्यामुळे सर्वच स्थरातून पंजाब संघाच्या या कार्याचे कौतुक करण्यात आले आहे.

वाचा : IPL 2019 : अखेर आयपीएलच्या साखळी फेरीचं वेळापत्रक जाहीर

IPL ही स्पर्धा २३ मार्च पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेतील साखळी सामन्यांचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. लोकसभा निवडणुकींच्या धर्तीवर काही सामन्यांना कात्री लागणार की काय, अशी शक्यता असताना. आता प्रत्येक संघाचे सात सामने आपल्या घरच्या मैदानावर खेळले जाणार आहे. पंजाब संघाचे होम ग्राऊंड मोहाली स्टेडियम असून या संघाचा पहिला सामना 25 मार्च रोजी राजस्थानच्या विरोधात जयपूर येथे होणार आहे.

First published: March 20, 2019, 7:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading