News18 Lokmat

IPL 2019 : ... बुटाने दारू पिणार 'हा' खेळाडू

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या या खेळाडूला प्यायची आहे बुटातून दारू

News18 Lokmat | Updated On: Mar 30, 2019 08:56 AM IST

IPL 2019 : ... बुटाने दारू पिणार 'हा' खेळाडू

मुंबई, 30 मार्च : आयपीएलच्या 12 व्या हंगामाला सुरुवात होऊन एक आठवडा झाला. आता सर्वच संघ गुणतक्त्यात आपले स्थान वरच्या क्रमांकावर रहावे यासाठी धडपडताना दिसत आहेत. प्रत्येक संघ आयपीएल जिंकायचे यासाठीच मैदानात उतरला आहे. दरम्यान एका खेळाडूने आपण आयपीएल जिंकल्यास बुटाने दारू पिणार असल्याचे सांगितले आहे.

किंग्ज पंजाब इलेव्हन संघाकडून खेळणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू टाय ने आयपीएलचे विजेतेपद जिंकल्यास आपण बुटातून दारू पिण्याचा विचार करेन असं म्हटलं आहे. याबाबतचे वृत्त किंग्ज इलेव्हन पंजाबच्या वेबसाईटवर देण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा फॉर्म्युला वन ड्रायव्हर डेनियल रिकियार्डोनं बुटातून दारू पिल्यानंतर याची चर्चा झाली होती. त्यानंतर जेव्हा जेव्हा त्याने शर्यत जिंकली तेव्हा बुटातून दारू प्यायला. खरंतर हि परंपरा मॅड ह्यूजने सुरु केल्याची माहिती मिळते. यापूर्वी ऑस्ट्रेलियातील सुप्रसिद्ध अभिनेता सर पेट्रिक स्टीवर्ट आणि गेरार्ड बटलर हे दोघेही बुटातून दारू प्यायले आहेत.

पाहा VIDEO : महिला पत्रकाराला जबरदस्तीने किस करणं भोवलं, बॉक्सर निलंबित

टायने म्हटले की, मी फॉर्म्युला वन रेसिंगचा चाहता आहे. मी लहान असताना वडिलांसोबत कार रेसिंग पहायचो. डेनियल रिकियार्डो आणि मी दोघेही पर्थचे आहोत. अंड्र्यू टाय आयपीएलच्या गेल्या हंगामात सर्वात जास्त गडी बाद करणारा गोलंदाज ठरला होती.

Loading...

माझं पहिलं भाषण का ट्रोल झालं? काय म्हणाले पार्थ पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2019 08:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...