Home /News /sport /

'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय

'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय

94 धावांचा पाठलाग करत असताना हैदाराबादचा संघ 178 धावांवर गारद झाला.

मोहाली, 19 एप्रिल : गेल नावाच्या वादळापुढे हैदाराबादची टीम अक्षरश: वाहून गेली. 194 धावांचा पाठलाग करत असताना हैदाराबादचा संघ 178 धावांवर गारद झाला. किंग्ज इलेव्हन पंजाने शानदार 15 धावांनी विजय मिळवला. मोहालीच्या मैदानावर आज ख्रिस गेल नावाचे वादळाने आयपीएलच्या अकराव्या हंगामातले पहिले शतक झळकावून 'मी परत आलोय' अशी गर्जना केलीये. गेलच्या वादळी 104 धावांच्या खेळीवर किंग्स इलेव्हन पंजाने 193 धावांचा डोंगर उभा केला. 194 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या सनरायझर्सची भंबेरीच उडाली.  सलामीला आलेला शिखर धवन दुखापतीमुळे माघारी परतलाय. तर ऋद्धिमान साहा 6 धावा करून बाद झाला. केन विल्यमसने टीमची कमान सांभाळली. त्याने 41 चेंडूत 54 धावा केल्यात तर मनिष पांडेनं नाबाद 57 धावांची खेळी केली. पण दोघांचीही खेळी व्यर्थ राहिली. पंजाबच्या भेदक माऱ्यापुढे आणि धावांचा डोंगरापुढे टीम पूर्णपणे ढेपाळली. निर्धारित 20 षटकात हैदराबादच्या संघाचा 178 धावांवर खुर्दा पडला. पंजाबची इनिंग सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब महामुकाबल्यात पंजाबने टाॅस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. ओपनिंगला आलेल्या केएल राहुल 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर मयंक अग्रवालही  18 धावा करून झटपट बाद झाला. पण दुसरीकडे ख्रिस गेलची फटकेबाजी सुरूच होती. ख्रिस गेलने 58 चेंडूत आयपीएल इतिहासात सातवं आणि टी-20 क्रिकेटमध्ये 21 वं शतक झळकावलं.  गेलने तब्बल 11 षटकार आणि एक चौकार लगावला. गेलने आपलं हे शतक आपल्या मुलीला डेडिकेट केलंय.
First published:

Tags: IPL2018, Kings XI Punjab, SRH, Sunrisers hyderabad

पुढील बातम्या