पुणे रायझिंगवर विजय मिळवत 'पंजाब'चा 'भांगडा'

आयपीएलच्या दहाव्या सिझनच्या चौथ्या मॅचमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबने रायझिंग पुणे सुपरजायंटचा 6 विकेटसने पराभव केला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2017 08:56 PM IST

पुणे रायझिंगवर विजय मिळवत 'पंजाब'चा 'भांगडा'

08 एप्रिल : आयपीएलच्या दहाव्या सिझनच्या चौथ्या मॅचमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबने रायझिंग पुणे सुपरजायंटचा 6 विकेटसने पराभव केला. कॅप्टन मॅक्सवेलच्या तडाखेबाज फलंदाजीच्या बळावर पंजाबने पहिल्याच मॅचमध्ये 'भांगडा' केलाय.

याआधी पुणे टीमने पहिली बॅटिंग करत 20 ओव्हर्समध्ये 163 रन्स केले. पुण्याकडून बेन स्टोक्सने अर्धशतकी खेळी करत 32 बाॅल्समध्ये 2 चौक आणि 3 सिक्स लगावले. तर दुसरीकडे मनोज तिवारीने बेन स्टोक्सला साथ देत 40 रन्स केले. पंजाबकडून संदीप शर्माने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या तर अक्षर पटेल, नटराजन, मार्कन स्टाॅयनिस आणि स्वप्निल सिंहने प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या.

164 रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाब इलेव्हनची खराब सुरुवात राहिली. तिसऱ्याच ओव्हरमध्ये मन्ना ओव्हरा आऊट झाला. त्यानंतर पाचव्या ओव्हरमध्ये वृद्धीमान साह 14 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर कॅप्टन गेलेन मॅक्सवेलने कमान सांभाळात विजयाचा पाया भरला. मॅक्सवेलने शानदार 44 रन्सची खेळी करत पंजाबला पहिला विजय मिळवून दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2017 08:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...