स्पोर्ट्स

  • associate partner

धोनीच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणारा तरुण गुजरातमधला; पोलिसांना अटकेची सूचना

धोनीच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणारा तरुण गुजरातमधला; पोलिसांना अटकेची सूचना

माहीच्या मुलीवर सोशल मीडियावर धमकी दिल्यानंतर देशभरातून राग व्यक्त केला जात होता.

  • Share this:

रांची, 11 ऑक्टोबर : क्रिकेटर महेन्द्र सिंह धोनी (MS Dhoni) याची मुलगी जीवाबाबत सोशल मीडियावर अभद्र टिप्पणी प्रकरणात रांची पोलिसांनी (Ranchi Police) प्राथमिक गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात एका मुलाला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात आयपी एड्रेसमधून अभद्र टिप्पणी आणि धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर कारवाई करीत एका मुलाला अटक करण्यात आली आहे.

यापूर्वी धोनीच्या कुटुंबाची परवानगी मिळाल्यानंतर पोलिसांनी रातू ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर रांची पोलिसांनी टेक्निकट टीम या प्रकरणात तपास करीत होती. तपासात गुजरातच्या आयपी एड्रेसमधून मॅसेज पाठविल्याची माहिती समोर आल्यानंतर धोनीच्या घरावरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

हे ही वाचा-मोठी बातमी! युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल रुग्णालयात, 'या' आजाराशी देत आहे झुंज

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रांची पोलिसांच्या सूचनेवरुन गुजरात पोलिसांनी सगीर नावाच्या तरुणाला अटक केली आहे. तो 12 वीचा विद्यार्थी आहे आणि कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा तहसीलमधील नाना कपाया गावात राहणारा आहे. गुजरात पोलिसांनी सगीरला रांची पोलिसांच्या हवाली करतील. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा 10 धावांनी पराभव झाला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानेही फारशी चांगली कामगिरी केली नाही. त्यानंतर सोशल मीडियावरुन धोनीवर टीका केली जात होती. यातच काही विकृत नेटकाऱ्यांनी चक्क धोनीच्या 6 वर्षांच्या मुलीला बलात्काराची धमी दिल्याचा प्रकार समोर आला.

यंदाच्या आयपीएलच्या सामन्यात धोनी फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही.

त्यामुळे धोनीवर सातत्याने टीका केला जात आहे. त्याची परिसीमा म्हणजे काही विकृत नेटकऱ्यांनी चक्क धोनीची 6 वर्षांची मुलगी झिवा हिला बलात्काराची धमकी दिली. यानंतर सोशल मीडियावरुन तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. शिवसेनेच्या खासदारांसह अनेकांनी ट्विट करीत यावर चीड व्यक्त केली. सोशल मीडियाच्या वापराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: October 11, 2020, 9:27 PM IST

ताज्या बातम्या