मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पोलार्डने निवडले T20 मधले टॉप-5 खेळाडू, फक्त एका भारतीयाचा समावेश!

पोलार्डने निवडले T20 मधले टॉप-5 खेळाडू, फक्त एका भारतीयाचा समावेश!

वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने (Kieron Pollard) टी-20 फॉरमॅटचे सर्वोत्तम 5 खेळाडू निवडले आहेत. या पाच जणांच्या यादीत त्याने फक्त एकाच भारतीयाचा समावेश केला आहे.

  • Published by:  Shreyas

दुबई, 6 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) 17 ऑक्टोबरपासून ओमान आणि युएईमध्ये सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सगळ्याच देशांनी आपल्या टीमची निवड केली आहे. सध्या हे सगळे खेळाडू आयपीएलमध्ये (IPL) खेळत आहेत, त्याआधी वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने (Kieron Pollard) टी-20 फॉरमॅटचे सर्वोत्तम 5 खेळाडू निवडले आहेत. या पाच जणांच्या यादीत त्याने फक्त एकाच भारतीयाचा समावेश केला आहे. पोलार्डने टी-20 मधल्या टॉप-5 खेळाडूंमध्ये क्रिस गेल, एमएस धोनी लसिथ मलिंगा आणि सुनिल नारायण यांची निवड केली याशिवाय त्याने स्वत:ला पाचवं स्थान दिलं.

पोलार्डने टॉप-5 खेळाडूंच्या यादीत पहिलं स्थान युनिव्हर्स बॉस क्रिस गेलला (Chris Gayle) दिलं. गेलच्या नावावर 74 आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचमध्ये 1,854 रन आहेत. तर फ्रॅन्चायजी क्रिकेटसह गेलने 448 सामन्यांमध्ये 14,276 रन केले आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रमही गेलच्या नावावर आहे.

गेलनंतर पोलार्डने दुसऱ्या क्रमांकावर लसिथ मलिंगाला (Lasith Malinga) स्थान दिलं आहे. मलिंगाने 84 टी-20 मध्ये एकूण 107 विकेट घेतल्या आहेत. आयसीसीने शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये पोलार्डने टॉप-5 खेळाडूंची यादी सांगितली.

स्पिनर म्हणून पोलार्डने त्याच्याच टीममधल्या सुनिल नारायणला (Sunil Narine) निवडलं. मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळख मिळवलेल्या नारायणने 379 टी-20 सामन्यांमध्ये 419 विकेट घेतल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये नारायण तिसऱ्या क्रमांकावर आहे.

जगातल्या सर्वोत्तम फिनिशरपैकी एक असलेल्या धोनीला (MS Dhoni) पोलार्डने चौथं स्थान दिलं आहे. धोनीने क्रिकेटच्या सगळ्यात छोट्या फॉरमॅटमध्ये 344 मॅच खेळून 6,905 रन केले. धोनी महान फिनिशर असल्याचं पोलार्ड म्हणाला. यानंतर त्याने स्वत:ला पाचव्या क्रमांकावर निवडलं. माझं टी-20 रेकॉर्ड जबरदस्त असल्याची प्रतिक्रिया पोलार्डने दिली. पोलार्डने आतापर्यंत टी-20 फॉरमॅटमध्ये 11,223 रन केले आणि 300 विकेट मिळवल्या.

First published:

Tags: IPL 2021, Kieron pollard, T20 cricket, T20 world cup