Home /News /sport /

'लहान मुलंही तुला बघतात, शब्द जपून वापर', भारतीय क्रिकेटपटूचा विराटला सल्ला

'लहान मुलंही तुला बघतात, शब्द जपून वापर', भारतीय क्रिकेटपटूचा विराटला सल्ला

क्रिकेटपटूंकडे बघून अनेक लहान मुलं त्यांच्यासारखं व्हायची स्वप्न बघतात. अनेकवेळा तर मुलं क्रिकेटपटूंच्या मैदानातल्या वागण्याचं अनुकरण करतात. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा मैदानातल्या त्याच्या आक्रमकपणाबाबत ओळखला जातो.

पुढे वाचा ...
    मुंबई, 12 जुलै: भारतामध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत क्रिकेट हा सगळ्यात लोकप्रिय खेळ आहे. लहान मुलांसाठी तर क्रिकेटपटू हे आयडल आणि रोल मॉडेलच असतात. क्रिकेटपटूंकडे बघून अनेक लहान मुलं त्यांच्यासारखं व्हायची स्वप्न बघतात. अनेकवेळा तर मुलं क्रिकेटपटूंच्या मैदानातल्या वागण्याचं अनुकरण करतात. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा मैदानातल्या त्याच्या आक्रमकपणाबाबत ओळखला जातो. विराट कोहली (Virat Kohli) याने मैदानातल्या त्याच्या हावभावांबाबत आणि शब्द वापरण्याबाबत जपून राहिलं पाहिजे, असं मत भारताचा माजी क्रिकेटपटू दीप दास गुप्ता (Deep Das Gupta) याने मांडलं आहे. विराट कोहली हा बरेच वेळा मैदानात जास्तच आक्रमक होतो. कोहलीच्या मैदानातल्या याच उर्जेमुळे कोहलीला चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते, पण मैदानाबाहेर विराटसारखा शांत माणूस कोणीच नाही, असं दीप दास गुप्ता म्हणाला. आपल्या युट्यूब चॅनलवर विराट कोहलीच्या या आक्रमकपणाबाबत दीप दास गुप्ता बोलत होता. 'विराट तिकडे कर्णधार म्हणून असतो, तो देशाचा प्रतिनिधी असतो, जेव्हा तुम्ही परदेशात खेळत असता. मी साऊथम्पटनमध्ये नव्हतो, त्यामुळे त्याने काय केलं ते मला माहिती नाही. त्याने शब्द जपून वापरावेत आणि हावभाव करतानाही स्वत:वर ताबा ठेवावा, या मताशी मी सहमत आहे. काही वेळा तो वाहावत जातो. लहान मुलं त्याला बघत असतात, लाखो मुलांसाठी तो रोल मॉडेल आहे,' असं वक्तव्य दीप दास गुप्ता याने केलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलवेळी (WTC Final) घडलेला एक किस्सा न्यूझीलंडचा फास्ट बॉलर नील वॅगनर (Neil Wagner) याने सांगितला. साऊथम्पटनमध्ये कोहलीला त्रास देण्यासाठी प्रेक्षक गाणी म्हणत होते, त्यावेळी विराटने विकेट मिळाल्यानंतर जल्लोष करताना तोंडावर हात ठेवला आणि प्रेक्षकांना शांत राहायला सांगत प्रत्युत्तर दिलं. मॅचनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नील वॅगनरने याबाबत खुलासा केला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या