कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचं पहिलं मेडल लिलावात

आजच्याच दिवशी 65 वर्षांपूर्वी भारताला ऑलम्पिकमधील पहिले मेडल मिळाले. पण देशासाठी अनमोल असणारं हे मेडल दुर्दैवाने आज लिलावात काढण्यात आलं आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2017 01:33 PM IST

कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचं पहिलं मेडल लिलावात

मंगेश चिवटे, 24 जुलै : आज 24 जुलै. आजच्याच दिवशी 65 वर्षांपूर्वी भारताला ऑलम्पिकमधील पहिले मेडल मिळाले. पण देशासाठी अनमोल असणारं हे मेडल दुर्दैवाने आज लिलावात काढण्यात आलं आहे.

भारताला पहिलंवहिलं ऑलिम्पिक मेडल मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या गोळेश्वर गावातली ही छोटीशी तालीम. खाशाबांची आठवण म्हणून बांधलेली. गावातली लहान मुलं इथं सराव करतात. पण ज्या गावात ऑलिम्पिकवीर कुस्तीपटू जन्मला त्याच गावात  केवळ ही तालिम सोडली तर कुस्तीपटूंसाठी कोणत्याच सुविधा नाहीत.

गोळेश्वरमध्ये जागतिक कुस्ती संकुल व्हावं, यासाठी खाशाबाचे कुटुंबीय आणि गावकरी वर्षानुवर्षे पाठपुरावा करतायत. यासाठी स्वतः खाशाबांच्या कुटुंबीयांनी जमीन देऊ केली. पण सरकारनं वारंवार आश्वासन देऊनही ते पाळलं नाही.त्यामुळे आता ऑलिम्पिक मेडलच लिलावात काढून हे स्वप्न पूर्ण करण्याची तयारी गावकऱ्यांनी केलीय.

मुर्दाड प्रशासनाचा लाल फितशाहीचा कारभार आणि प्रबळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ उभारल्या जाणाऱ्या कुस्ती संकुलाचं काम रखडलंय.

खाशाबा यांच्यानंतर भारताला ऑलम्पिक मध्ये मेडल मिळवायला तब्बल 44 वर्षे वाट पहावी लागली. पण, दुर्दैवाने खाशाबा जाधवसारख्या महान खेळाडूच्या नशिबी जिवंतपणी आणि मरणोत्तरही अवहेलनाच वाट्याला आलीय. भारताचा गौरव असलेल्या पहिल्यावहिल्या मेडलची विक्री होण्याआधी क्रीडा मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना जाग येणार का हेच पाहायचं ?

Loading...

>>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2017 01:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...