Home /News /sport /

मी जरी भारत सोडला असला तरी... केविन पीटरसननं हिंदीत Tweet करत व्यक्त केली काळजी

मी जरी भारत सोडला असला तरी... केविन पीटरसननं हिंदीत Tweet करत व्यक्त केली काळजी

इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने (kevin pietersen) ट्विट करून भारताच्या कोरोना परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे आणि लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. पीटरसन यंदा आयपीएल दरम्यान कॉमेंटरी पॅनेलचा एक भाग होता.

    नवी दिल्ली, 11 मे : देशातील कोरोना स्थिती (Corona in India) अतिशय चिंताजनक आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आणि रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याचे पाहून केवळ भारतीय लोकच नव्हे तर परदेशी लोकही भारताच्या परिस्थितीबद्दल चिंतेत आहेत. जगातील विविध देशांमधील लोक भारताच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहेत. कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने (Corona Second Wave) भारतामध्ये विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना देशातील बर्‍याच राज्यांमध्ये पीक पाँईटला पोहचला आहे आणि दररोज हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. कोविडची साखळी तोडता यावी यासाठी आणि लोकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारांनी नाईलाजास्तव लॉकडाउन लावला आहे. दरम्यान, या परिस्थितीमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने (kevin pietersen) ट्विट करून भारताच्या कोरोना परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे आणि लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. पीटरसन यंदा आयपीएल दरम्यान कॉमेंटरी पॅनेलचा एक भाग होता. केविन पीटरसनचं ट्विट इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने ट्विट करून भारतीयांना कोरोना काळात मानसिक बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने ट्विट करून म्हटले आहे की, 'मी सध्या भारत सोडला आहे, परंतु तरीही मी अशा एका देशाचा विचार करीत आहे ज्याने मला खूप प्रेम आणि आपुलकी दिली आहे, कृपया तुम्ही सर्वांनी सुरक्षित रहा, ही वेळ निघून जाईल परंतु, सर्वांनी सावधगिरी बाळगावी लागेल. आयपीएल 2021 रद्द होण्यापूर्वी पीटरसन भारतातच होता. हे वाचा - हिंदू मुलीने पाकिस्तानात रचला इतिहास; हजारोंमधून तिला मिळाली बदल घडवण्यासाठी सिस्टमचा भाग होण्याची संधी आयपीएल 2021 दरम्यान काही खेळाडूंचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित केले आहेत. त्यामुळे परदेशी क्रिकेटपटू आपापल्या देशात परत गेले आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन भारतावर खूप प्रेम करतो. त्याने अनेकदा सोशल मीडियावरून भारताविषयी लिहीत ममत्व व्यक्त केलं आहे. पीटरसन आयपीएल 2021 दरम्यान कॉमेंट्री पॅनलाचा सदस्य होता. कोविडमुळे आयपीएलमध्येच थांबवावे लागले होते आणि आता पीटरसन त्याच्या इंग्लंडमध्ये घरी पोहोचला आहे. हे वाचा - ‘या’ राज्यात दारुची ऑनलाईन डिलीव्हरी सुरू होताच ऑर्डर्सचा भडीमार, तासाभरातच अ‍ॅप क्रॅश कोरोनाच्या या दुसर्‍या भीषण लाटेशी लढा देत असलेल्या भारतीयांसाठी आपुकली व्यक्त करत पीटरसनने हिंदीमध्ये ट्विट केले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, England, IPL 2021

    पुढील बातम्या