• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • सचिनला कोरोना झाल्यावर पीटरसनचं ट्वीट, चाहत्यांनी केलं ट्रोल, युवीचंही सडेतोड प्रत्युत्तर

सचिनला कोरोना झाल्यावर पीटरसनचं ट्वीट, चाहत्यांनी केलं ट्रोल, युवीचंही सडेतोड प्रत्युत्तर

सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असतानाच इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने (Kevin Pietersen) केलेल्या एका ट्वीटमुळे चाहत्यांनी त्याला चांगलंच सुनावलं आहे. युवराज सिंगनेही (Yuvraj Singh) पीटरसनला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 27 मार्च : जगातला सगळ्यात महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला कोरोनाची लागण झाली आहे. सचिनने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करून आपल्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यायचं आवाहन केलं आहे. एकीकडे सचिन तेंडुलकरची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असतानाच इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने (Kevin Pietersen) केलेल्या एका ट्वीटमुळे चाहत्यांनी त्याला चांगलंच सुनावलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं लोकं सोशल मीडियावर का सांगतात? असा सवाल पीटरसनने विचारला. हे ट्वीट केल्यानंतर सचिनच्या चाहत्यांनी पीटरसनला ट्रोल करायला सुरूवात केली, पण पीटरसनने मात्र सारवासारव करत आपल्याला सचिनची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं माहिती नव्हतं, असं सांगितलं. तसंच सचिनला लवकर बरं वाटावं, यासाठी आपण प्रार्थना करत असल्याचंही पीटरसन म्हणाला. yuvraj singh reply on kevin pietersen tweet टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनेही (Yuvraj Singh) पीटरसनला सुनावलं. तुझ्या डोक्यात आजच ही गोष्ट का आली, आधी का आली नाही? असा सवाल युवराजने विचारला. यानंतर पीटरसनने माफी मागितली, तसंच आपल्याला सचिनला कोरोना झालं नसल्याचं आत्ताच कळालं, असं स्पष्टीकरणही त्याने दिलं. याचसोबत त्याने सचिन तेंडुलकरला पोस्टमध्ये टॅग करून त्याला लवकरात लवकर बरं वाटावं, अशी प्रार्थनाही केली. yuvraj singh reply on kevin pietersen tweet टीकेचा रोष वाढल्यानंतर केव्हिन पीटरसनने स्वत:च या प्रश्नाचं उत्तर दिलं.'हा खूप सोपा प्रश्न होता. अनेक जण सोशल मीडियावर कोरोना झाल्याची घोषणा करतात, कारण त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना टेस्ट करावी, असं त्यांना सांगायचं असतं,' असं पीटरसन म्हणाला. kevin pietersen tweet on covid 19 पीटरसन, युवराज आणि सचिन तिघंही या महिन्यात झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी-20 स्पर्धेत खेळले होते. सचिनची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असली तरी सुदैवाने त्याच्या घरातल्या इतरांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. सचिनने स्वत:ला घरातच क्वारंटाईन करून घेतलं आहे. सचिनच्या आधी शाहिद आफ्रिदी, शाय होप, मशरफे मुर्तझा, सौरव गांगुली, मोईन अली यांना कोरोनाची लागण झाली होती.
  Published by:Shreyas
  First published: