मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी निशाणा साधत असतानाच, केव्हिन पीटरसन मोदींना म्हणाला...

आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी निशाणा साधत असतानाच, केव्हिन पीटरसन मोदींना म्हणाला...

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात (Farmers Protest) शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आता आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनीही पाठिंबा दिला आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतानाच इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन(Kevin Pietersen) याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (PM Narendra Modi) कौतुक केलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात (Farmers Protest) शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आता आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनीही पाठिंबा दिला आहे. पॉपस्टार रिहाना, ग्रेटा थनबर्ग आणि मिया खलिफा यांनी भारतातल्या शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केलं आहे. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींच्या या भूमिकेनंतर भारत सरकारनेही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ही भारतातली अंतर्गत बाब असल्याचं सांगत सरकारनं या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना सुनावलं आहे. भारत सरकारच्या या भूमिकेचं अक्षय कुमार, अजय देवगन, करण जोहर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांनीही समर्थन केलं आहे.

एकीकडे आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतानाच इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन(Kevin Pietersen) याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (PM Narendra Modi) कौतुक केलं आहे. दक्षिण आफ्रिकेला कोरोनाची लस पाठवण्याचा भारताचा निर्णय उदारता आणि दयाळूपणा दाखवतं असं पीटरसन म्हणाला आहे.

भारत सरकारने कोरोनाच्या लशीची पहिली खेप अल्जेरिया आणि दक्षिण आफ्रिकेला पाठवले आहेत. याशिवाय भूटान, मालदीव, बांगलादेश, ब्राझील आणि नेपाळ यांनाही लस पाठवण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाची लस पोहोचवल्याबद्दल पीटरसनने मोदींचं अभिनंदन केलं आहे.

केव्हिन पीटरसनच्या या ट्विटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रतिक्रिया दिली आहे. 'भारताबाबतचं तुझं प्रेम पाहून आनंद झाला. जगच आमचं कुटंब असल्याचं आम्ही मानतो. कोरोनाविरुद्धची लढाई मजबूत करण्यासाठी आम्ही भूमिका बजावू इच्छितो,' असं ट्विट मोदींनी केलं. भारताची उदारता आणि दयाळूपणा दिवसेंदिवस वाढत आहे. या देशावर माझं प्रेम आहे, असं पीटरसन म्हणाला होता.

दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला केव्हिन पीटरसन नंतर इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेला. इंग्लंडसाठी त्याने 104 टेस्ट मॅचमध्ये 47.28 च्या सरासरीने 8,181 रन केले. तर 136 वनडेमध्ये त्याने 40.37 च्या सरासरीने 4,440 आणि 37 टी-20 मध्ये 37.93 च्या सरासरीने 1,176 रन केले.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भारतातून दक्षिण आफ्रिकेला विमानाने चाललेल्या लशींचा फोटो शेयर केला होता. भारतामध्ये कोरोनाच्या दोन लशी तयार होत आहेत. जगभरात या लशींना मागणी वाढत आहे.

First published: