मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पीटरसनची धक्कादायक भविष्यवाणी, 2026 पर्यंत संपतील 7 टीम!

पीटरसनची धक्कादायक भविष्यवाणी, 2026 पर्यंत संपतील 7 टीम!

पीटरसनची धक्कादायक भविष्यवाणी

पीटरसनची धक्कादायक भविष्यवाणी

टी-20 क्रिकेटमुळे (T20 Cricket) टेस्ट क्रिकेट हळू-हळू श्वास टाकताना दिसत आहे. अनेक क्रिकेटपटूंनी टेस्ट क्रिकेटबाबत (Test Cricket) चिंता व्यक्त केली आहे. या यादीत आता केव्हिन पीटरसनचं (Kevin Pietersen) नावही आलं आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 4 सप्टेंबर : टी-20 क्रिकेटमुळे (T20 Cricket) टेस्ट क्रिकेट हळू-हळू श्वास टाकताना दिसत आहे. अनेक क्रिकेटपटूंनी टेस्ट क्रिकेटबाबत (Test Cricket) चिंता व्यक्त केली आहे. या यादीत आता केव्हिन पीटरसनचं (Kevin Pietersen) नावही आलं आहे. एका ब्लॉगमध्ये पीटरसनने टेस्ट क्रिकेटच्या भवितव्याबाबत भाष्य केलं आहे. याबाबत एक ट्वीट केलं आहे. पीटरसनने टेस्ट क्रिकेटच्या भविष्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे.

माझ्यासाठी हे ट्वीट करणं खूप त्रासदायक आहे, पण माझ्यामते हळू हळू टेस्ट क्रिकेट संपून जाईल. 2026 म्हणजेच पाच वर्षांनी टेस्ट खेळणारे बोटावर मोजण्याइतकेच देश राहतील. यामध्ये इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया, संभाव्यपणे दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानच उरतील, असं भाकीत पीटरसनने वर्तवलं आहे. पीटरसनचं भविष्य खरं ठरलं तर पुढच्या 5 वर्षांमध्ये टेस्ट खेळणाऱ्या 7 टीम संपतील, यामध्ये वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि श्रीलंका या टीमचा समावेश आहे.

पीटरसनने व्यक्त केलेली भीती गेल्या काही वर्षांमधले आकडे बघितले तरी खरे वाटू लागतात. मागच्या 5 वर्षांमध्ये टेस्टपेक्षा टी-20 मॅच 3 पट जास्त झाल्या आहेत. 4 सप्टेंबर 2016 पासून आतापर्यंत 1,222 आंतरराष्ट्रीय टी-20 मॅच झाल्या, यात 50 टीम सहभागी झाल्या. याच काळात 21 देशांनी 1080 वनडे मॅच खेळल्या, ज्यात एका वर्ल्ड कपचाही समावेश होता. या काळात 12 देशांनी 426 टेस्ट खेळल्या.

मागच्या 5 वर्षांमध्ये इंग्लंडने सर्वाधिक 64 टेस्ट खेळल्या, ज्यात त्यांनी 28 मॅच जिंकल्या आणि 26 पराभव आणि 9 मॅच ड्रॉ झाल्या. भारताने मागच्या 5 वर्षात 56 टेस्ट खेळल्या, ज्यात 34 विजय 14 पराभव आणि 7 मॅच ड्रॉ झाल्या. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंका आहे. श्रीलंकेचे 46 टेस्टमध्ये 15 विजय, 21 पराभव आणि 10 मॅच ड्रॉ झाल्या.

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने मागच्या 5 वर्षात 43-43 टेस्ट खेळल्या, तर पाकिस्तानने 40, वेस्ट इंडिजने 41 आणि सध्या पहिल्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडने 37 टेस्ट खेळल्या आहेत.

झिम्बाब्वे, अफगाणिस्तान, आयर्लंड यांनी मागच्या 5 वर्षात मिळून 25 टेस्ट खेळल्या, यात झिम्बाब्वेने सर्वाधिक 16, अफगाणिस्तानने 6 आणि आयर्लंडने 3 मॅच खेळल्या. टेस्ट क्रमवारीत पहिल्या पाच क्रमांकावर असलेल्या टीमनी एकूण 240 टेस्ट खेळल्या, तर तळाच्या 5 टीम एकूण 426 टेस्टपैकी 56 टक्के टेस्ट खेळल्या.

First published:

Tags: Cricket