क्रिकेटच्या देवाचे ग्रंथालय; इतक्या भाषेत आहेत पुस्तके!

क्रिकेटच्या देवाचे ग्रंथालय; इतक्या भाषेत आहेत पुस्तके!

सचिनचा एक अनोखा चाहता आहे, ज्याने ग्रंथालय उभे केले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जानेवारी : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन बराच काळ लोटला आहे. पण तरी देखील क्रिकेटच्या चाहत्यांना आजही सचिनला मैदानावर पाहण्याची इच्छा असते. Miss u sachin असे फलक अनेक वेळा प्रेक्षकांच्या हातात दिसतात . सचिनचा सर्वात मोठा चाहता म्हणून सुशिल कुमारकडे पाहिले जाते. सचिनच्या निवृत्तीनंतर देखील तो भारतीय संघाच्या प्रत्येक सामन्यासाठी हजर असतो आणि सर्वांना सचिनची आठवण करून देतो. असाच सचिनचा एक अनोखा चाहता आहे, ज्याने ग्रंथालय उभे केले आहे.

केरळमधील मलबार येथील ख्रिश्चियन कॉलेजमध्ये इतिहासाचे प्राध्यापक असलेले वशिष्ट मणिकोठ यांनी कोझीकोडमध्ये सचिन तेंडुलकरवरील एक ग्रंथालयच तयार केले आहे. या ग्रंथालयात सचिनची आत्मकथा आणि त्याच्यावर लिहण्यात आलेली अन्य पुस्तके आहेत. मणिकोठ यांनी या ग्रंथालयात 60 हून अधिक पुस्तके जमा केली आहेत. ग्रंथालयात हिंदी, इंग्रजी, तामिळ, मळ्याळम, कन्नड, मराठी आणि गुजरातीसह 11 भाषेतील पुस्तके आहेत.

केवळ सचिन संदर्भातील पुस्तके एका ठिकाणी मिळण्याचे हे एकमेव ग्रंथालय असावे. मणिकोठ यांनी सुरु केलेल्या ग्रंथालयाची चर्चा आजूबाजूच्या परिसरात आहे. तरुणांमध्ये या ग्रंथालयाची मोठी क्रेझ पहायला मिळत आहे. क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंचे अनेक चाहते दिसतात. ते लक्ष वेधण्यासाठी अनेक गोष्टी करतात. पण मणिकोठ यांनी सचिनवरील पुस्तकाचे ग्रंथालय तयार करून आपण सर्वात वेगळे चाहते आहोत हे सिद्ध केले आहे.

VIDEO : ज्योतिरादित्य शिंदे झाले क्लिन बोल्ड, व्हिडिओ व्हायरल

First published: January 24, 2019, 12:00 PM IST

ताज्या बातम्या