S M L

VIDEO : 'या' कारणामुळं केदार जाधव वर्ल्ड कप संघात, नेटकरींनी केलं ट्रोल

वर्ल्ड कप संघात सामिल झालेला केदार जाधव याचं नेटकरींनी स्वागत न करता त्याला ट्रोल केलं.

News18 Lokmat | Updated On: Apr 15, 2019 08:35 PM IST

VIDEO : 'या' कारणामुळं केदार जाधव वर्ल्ड कप संघात, नेटकरींनी केलं ट्रोल

चेन्नई, 15 एप्रिल : इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यात मुंबईकर अजिंक्य रहाणेला डच्चू देण्यात आलं असलं तरी, पुणेकर केदार जाधवला संघात स्थान मिळालं. पण नेटकरींनी मात्र केदारचं स्वागत न करता त्याला ट्रोल करण्यात आलं आहे.

केदार जाधव सध्या चेन्नई सुपर किंग्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळत आहे. रविवारी कोलकाता विरोधात चेन्नईनं विजय मिळवला. दरम्यान, या विजयानंतर चेन्नईच्या खेळाडूंनी विजयाच्या आनंदाचा मनमुराद आस्वाद लुटला. यातच केदारनं आपल्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ टाकलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

Loading...

View this post on Instagram
 

Bromance ❤️


A post shared by Kedar Jadhav (@kedarjadhavofficial) on

या व्डिडिओत केदार आनंदाच्या क्षणात चेन्नईचा कर्णधार आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला चक्क घास भरवला. या व्हिडिओनंतर नेटकरांनी म्हणून केदार जाधव तुला वर्ल्ड कपचं तिकीट मिळालं आहे, अशी टीका केली. तर, काही नेटकरांनी रहाणेनं घास भरवला असता असा, तर तोही संघात असता का?, असा सवाल केला आहे.भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार मुंबईकर अजिंक्य रहाणेलाही 2019 च्या वर्ल्ड कप संघातून वगळण्यात आलं आहे.युवा खेळाडूंच्या संघातील समावेशानंतर एकदिवसीय संघात त्याला कमी संधी मिळाली. त्यामुळं काही चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं तर काहींनी केदार जाधवला संधी देणं योग्य आहे, असं मत व्यक्त केलं आहे.


2019 च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक.


VIDEO : काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, हे पाहून नवनीत राणांना कोसळलं रडू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 08:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close