पुणे, 17 एप्रिल : कोरोनामुळे सध्या देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे सगळे खेळाडूही लॉकडाऊनमध्ये आहेत. अशा परिस्थितीत सध्या टीम इंडियाचे खेळाडू सोशल मीडियावर विविध व्हिडीओ बनवण्यात व्यस्त आहेत. भारताचा आघाडीचा फलंदाज केदार जाधवने आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या आवडत्या खेळाडूंबाबत सांगितले.
केदारचा आवडता अभिनेता सलमान खान आहे, हे सर्वांना माहित आहे. मात्र केदारला जेव्हा चाहत्यांनी सलमान खान आणि एमएस धोनी यांच्यातील त्याचा आवडता सुपरस्टार कोण आहे, असे विचारले तेव्हा त्याने महेंद्रसिंग धोनी असे उत्तर दिले. यावेळी धोनीने एमएस धोनीला सलमानपेक्षा मोठा सुपरस्टार मानले आहे.
वाचा-कोरोनामध्येही 'हा' देश IPLचे आयोजन करण्यास तयार, BCCIला पाठवला प्रस्ताव
केदारने इन्स्टाग्रामवर सांगितले की, "दोघेही माझ्यासाठी सुपरस्टार आहेत. माझ्यासाठी दोघांमध्ये काहीही फरक नाही. मी जे क्रिकेट खेळलो होतो ते महेंद्रसिंग धोनीमुळे होते, पण मी सलमान खानला फक्त माही भाईमुळेच भेटलो. म्हणूनच मला वाटते की म्हणूनच माही भाई पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्यानंतर सलमान भाई". त्यानंतर केदारने उत्तर दिले की, "सलमान आणि एमएस यांच्यात निवड करणे म्हणजे त्याच्या आईवडिलांपैकी एक निवडण्यासारखे आहे. तुम्हाला कोण सर्वात जास्त पालकांमध्ये आवडतात हे विचारणे मला खूप अवघड आहे". केदार हा सलमान खानचा खुप मोठा चाहता आहे.
वाचा-'कोरोना भारताची दुसरी समस्या, तर पहिली जाहिल जमाती', भारतीय खेळाडूचे विधान
"CSK fans are just like Our CAPTAIN - no matter what I will back you and be with you in ups and downs. And if you have a family like the CSK fans that we have, we are bound to win more games than other teams," - Kedar Jadhav pic.twitter.com/bMSDudp3gb
— DHONIsm™ ❤️ (@DHONIism) April 17, 2020
वाचा-...तर टीम इंडिया ऑस्ट्रेलियात 4 कोटी 20 लाख डॉलरच्या हॉटेलमध्ये होणार क्वारंटाइन
यावेळी केदारने सचिनकडू पाहून क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहण्यास सुरुवात केली असेही सांगितले. तर, सचिनबरोबर ड्रेसिंग रूम कधीही शेअर करता आला नाही, याची खंतही केदारने व्यक्त केली.
संपादन, संकलन-प्रियांका गावडे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Salman khan