वर्ल्ड कपआधी भारताचा ‘हा’ खेळाडू झाला जखमी, पंतला मिळणार संधी ?

वर्ल्ड कपआधी भारताचा ‘हा’ खेळाडू झाला जखमी, पंतला मिळणार संधी ?

काही दिवसांवर विश्वचषक स्पर्धा आली असताना, त्यात भारतीय संघाच्या चिंता या खेळाडूनं वाढवल्या आहेत.

  • Share this:

मोहाली, 05 मे : आयपीएलचा बारावा हंगाम आता सध्या शेवटच्या टप्प्यात आला आहे. दरम्यान यानंतर लगेचच विश्वचषकाला सुरुवात होत असल्यानं क्रिकेट चाहत्यांसाठी ही पर्वणीच असणार आहे. मात्र, यातच खेळाडूंचं दुखापतग्रस्त होण्याचे प्रमाणही वाढलं. आता भारतीय संघाच्याही चिंता वाढल्या आहेत. कारण भारताच्या विश्वचषक संघात असलेला एका खेळाडूला सामन्यादरम्यान गंभीर दुखापत झाली.

आयपीएलमध्ये झालेल्या पंजाब आणि चेन्नई यांच्यात सामन्यात पंजाबनं 6 विकेटनं विजय मिळवला. पंजाबनं नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला, आणि चेन्नईनं प्रथम फलंदाजी करत पंजाबला 171 धावांचे आव्हान दिलं. दरम्यान राहुल आणि गेल यांनी धडाकेबाज फलंदाजी करत, तब्बल 108 धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावरच पंजाबनं हा सामना जिंकला. अखेर हरभजननं ही भागीदारी तोडली. मात्र 14व्या ओव्हरमध्ये एक अशी घटना घडली, ज्यामुळं विराट कोहलीच्या चिंता वाढणार आहेत.

वाचा हेही- VIDEO : सचिनचं शाहरुखला ओपन चॅलेंज, म्हणाला...

एकाच ओव्हरमध्ये दोन खेळाडू जखमी

पंजाब आणि चेन्नई यांच्यात झालेल्या सामन्यातील 14 ओव्हरमध्ये एक अजब घटना घडली. ब्राव्होच्या ओव्हरमध्ये दुसऱ्याच चेंडूवर पुरननं ड्राईव्ह लगावला, चेंडू सीमारेषेजवळ जडेजानं अडवला खरा पण त्यानं केलेला थ्रो ब्राव्होला पकडता आला नाही. दरम्यान चेंडू पुन्हा सीमारेषेजवळ गेला. त्यावेळी केदार जाधव फिल्डिंग करत असताना, त्याच्या खांद्याला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असावी, कारण लगेचच केदार मैदानाबाहेर पडला. दरम्यान याच ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर एक धाव काढत असताना ब्राव्हो आणि पुरन एकमेकांवर आदळले.

IPL 2019 : कसोटी नाही तर टी-20 मधलं खणखणीत नाणं, दिल्लीसाठी ठरला हुकुमी एक्का

भारतीय संघाच्या चिंता वाढल्या

भारताने विश्वचषकासाठी जाहीर केलेल्या 15 खेळाडूंच्या यादीत केदार जाधवचही नाव आहे. दरम्यान, काही दिवासांवर विश्वचषक आला असताना, खेळाडूंची ही दुखापत संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. जर केदार जाधवची ही दुखापत गंभीर असेल तर त्याला विश्वचषकालाही मुकावं लागेल. त्यामुळं केदार जाधवच्या जागी रिषभ पंत किंवा अंबाती रायडू यांना संघात संधी मिळू शकते. रिषभ पंतला सध्या राखीव खेळाडू म्हणून ठेवले आहे.

VIDEO : धोनीचा ‘गुरुमंत्र’, एका रात्रीत पलटला रैनाचा खेळ

VIDEO : 'काँग्रेसवालों....तुम्हारा यह डर मुझे अच्छा लगता है'

First published: May 5, 2019, 8:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading