धोनीने माझं आयुष्यच बदलून टाकलं- केदार जाधव

सामन्यात गडी बाद करण्याच्या आपल्या कौशल्याचा खुलासाही जाधवने केला

  • Share this:

टीम इंडियाचा ऑल राऊंडर केदार जाधवने बुधवारी एशिया कप २०१८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केली. टीम इंडियाच्या त्या विजयात केदारचा मोलाचा वाटा आहे. खास म्हणजे जाधवच्या फलंदाजीने नाही तर गोलंदाजीने टीम इंडियाला जिंकून दिले. जाधवने ९ षटकात एक मेडन देऊन २३ धावांमध्ये ३ गडी बाद केले.

जाधवने पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद (६), आसिफ अली (९) आणि शादाब खान (८) यांना तंबूचा रस्ता दाखवला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात पाकिस्तानच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय पूर्णपणे चुकला. संपूर्ण संघ १६२ धावा करत तंबूत परतला.

सामन्यानंतर ३३ वर्षीय ऑलराऊंडर जाधवने आपल्या यशाचे श्रेय भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला दिले आहे. जाधव म्हणाला की, ‘२०१६ मध्ये न्यूझीलँडविरुद्ध सामन्यात धोनीने माझ्याकडे गोलंदाजीची जबाबदारी सोपवली. तेव्हापासून माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं.’ जाधवने ४२ एकदिवसीय सामन्यात १९ गडी बाद केले आहेत.

सामन्यात गडी बाद करण्याच्या आपल्या कौशल्याचा खुलासाही जाधवने केला. केदार फार नेटमध्ये गोलंदाजीवर काम करत नाही. गोलंदाजीचा अधिक अभ्यास केला तर त्याची गोलंदाजी समजण सोप्प होईल आणि सामन्यात वेगळे प्रयोग करु शकणार नाही, असं त्याला वाटतं.

४२ एकदिवसीय सामने खेळणारा जाधव म्हणाला की, ‘मी नेट्समध्ये गोलंदाजीचा फार सराव करत नाही. सामन्याच्य सुरूवातीला मी काही षटकांचा सराव करतो. मला वाटतं की नेट्समध्ये स्वतःच्या गोलंदाजीवर अधिक लक्ष दिलं तर जे काही मी सामन्यात करतो तसे चित्र दिसेलच असे नाही. त्यामुळे मी माझ्या मर्यादा लक्षात घेत सराव करतो.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2018 05:16 PM IST

ताज्या बातम्या