IPL 2019 : केदार बनला सल्लु तर, रोहित बनला शेरा, व्हिडीओ व्हायरल

IPL 2019 : केदार बनला सल्लु तर, रोहित बनला शेरा, व्हिडीओ व्हायरल

केदार जाधवचं हे असं रुप तुम्ही कधीच पाहिलं नसेल...

  • Share this:

मुंबई, 26 मार्च : भारतीय संघाचा ऑलराऊंडर आणि सध्याच्या IPL मधला चेन्नई संघाचा आघाडीचा खेळाडू म्हणजे केदार जाधव. आज केदारचा 34वा वाढदिवस आहे. केदार हा जेवढा मैदानात गाजतो, तेवढाच त्याच्या मस्तीखोर स्वभावामुळं मैदानाबाहेरही ओळखला जातो. केदारचा जन्म 26 मार्च 1985 रोजी पुणे येथे झाला. पण केदारचं हे रुप तुम्ही कधीही पाहिलं नसेल.

 

View this post on Instagram

 

When (race 4 ) walks you make way. Happy birthday bro @kedarjadhavofficial @arunkanade

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

केदारचं भारतीय संघात सल्लू भाई (सलमान खान) असं टोपण नाव रोहित शर्मानं ठेवले आहे. कारण केदारला सलमानची नक्कल करायला खुप आवडते. त्यामुळे आज त्याच्या वाढदिवसानिमित्त रोहित शर्मा आणि बीसीसीआयनं त्याचे मजेदार व्हिडिओ पोस्ट केले आहेत. ज्यात केदार सलमान खान तर, रोहित शर्मा त्याचा बॉडीगार्ड शेरा झाला आहे. केदार यात अगदी हुबेहुब सलमानच्या चालण्याची नक्कल करित आहे. तर, बीसीसीआयनं पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये केदार जाधव नाचताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Here's to more such dance moves, plenty of runs and wickets, wishing you a very happy birthday @kedarjadhavofficial 🍰🎂

A post shared by Team India (@indiancricketteam) on

चेन्नई संघाचा आज दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर दिल्ली कॅपिटल्स विरोधात सामना होणार आहे. केदार सध्या चेन्नईकडून खेळत असल्यानं आपल्या वाढदिवसाच्या फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी करत, आपल्या खेळून संघाला विजय मिळवून देण्यासाठी सज्ज आहे.

सहा भाषेत बोलते धोनीची लेक; पाहा बाप-लेकीचा 'हा' VIDEO

First published: March 26, 2019, 5:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading