मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

गांगुली-सेहवाग KBC मध्ये जिंकले एवढे रुपये, 'धोनी'चं उत्तर देण्यात दोघं अपयशी

गांगुली-सेहवाग KBC मध्ये जिंकले एवढे रुपये, 'धोनी'चं उत्तर देण्यात दोघं अपयशी

कौन बनेगा करोडपतीचा (KBC 13) कर्मवीर स्पेशल एपिसोडचं प्रसारण करण्यात आलं. या एपिसोडमध्ये हॉटसीटवर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आले.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 3 सप्टेंबर : कौन बनेगा करोडपतीचा (KBC 13) कर्मवीर स्पेशल एपिसोडचं प्रसारण करण्यात आलं. या एपिसोडमध्ये हॉटसीटवर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आले. या दोघांनी स्पर्धेत 25 लाख रुपये जिंकले. हे पैसे दोन्ही क्रिकेटपटू सौरव गांगुली फाऊंडेशन आणि वीरेंद्र सेहवाग फाऊंडेशनला देणार आहेत.

सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांनी या शोमध्ये टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधल्या कधीही न ऐकलेल्या गोष्टी सांगितल्या. तसंच काही काळासाठी सौरव गांगुली शोचा एँकर झाला आणि त्याने अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना हॉटसीटवर बसवलं. एवढंच नाही तर गांगुलीने बिग बींवर प्रश्नांचा भडीमार केला.

सौरव गांगुली झाला KBC चा एँकर, हॉट सीटवर बसल्यानंतर बिग बी म्हणाले... VIDEO

गांगुली आणि सेहवाग यांनी पहिल्या 7 प्रश्नांना एकही लाईफ लाईन वापरली नाही. 25 लाख रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी एकही लाईफ लाईन नसताना योग्य दिलं, पण त्यांना एमएस धोनीबाबतच्या (MS Dhoni) प्रश्नाचं उत्तर आलं नाही. एमएस धोनीने त्याच्या करियरमध्ये कोणत्या बॅट्समनला आऊट केलं? असा प्रश्न दोघांना विचारण्यात आला. यासाठी त्यांनी 50-50 लाईफ लाईन वापरली.

KBC 13 : उर्मिला मातोंडकरचं गाणं ऐकताच गांगुली म्हणाला 'रंगीला'

या प्रश्नाचं उत्तर ट्रॅव्हिस डाऊनलीन होतं. 2009 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धोनीने डाऊनलीनला आऊट केलं होतं. त्यावेळी गांगुली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता, तर सेहवाग दुखापतीमुळे ही स्पर्धा खेळू शकला नव्हता.

First published:

Tags: Amitabh Bachchan, KBC, Sourav ganguly, Virender sehwag