मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

KBC 13 : उर्मिला मातोंडकरचं गाणं ऐकताच गांगुली म्हणाला 'रंगीला'

KBC 13 : उर्मिला मातोंडकरचं गाणं ऐकताच गांगुली म्हणाला 'रंगीला'

बिग बींचा पर्याय ऐकण्याआधीच दादाने दिलं उत्तर

बिग बींचा पर्याय ऐकण्याआधीच दादाने दिलं उत्तर

कौन बनेगा करोडपतीचा (KBC 13) कर्मवीर स्पेशल एपिसोडचं आज प्रसारण करण्यात आलं. या एपिसोडमध्ये हॉटसीटवर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आले.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 3 सप्टेंबर : कौन बनेगा करोडपतीचा (KBC 13) कर्मवीर स्पेशल एपिसोडचं आज प्रसारण करण्यात आलं. या एपिसोडमध्ये हॉटसीटवर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आले. या शोदरम्यान अमिताभ बच्चन यांनी सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांना एका गाण्याची धून ऐकवून प्रश्न विचारला.

गाण्याची धून ऐकवून झाल्यानंतर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांना प्रश्न विचारून चार पर्याय दिले. सौरव गांगुलीने मात्र बिग बींना पर्याय द्यायचीही संधी दिली नाही. गाण्याची धून ऐकताच हॉट सीटवर बसलेल्या सौरव गांगुलीने आपल्यासोबत असलेल्या वीरेंद्र सेहवागला रंगीला असं सांगितलं.

सौरव गांगुली झाला KBC चा एँकर, हॉट सीटवर बसल्यानंतर बिग बी म्हणाले... VIDEO

कौन बनेगा करोडपतीच्या या एपिसोडमध्ये उर्मिला मातोंडकरचा (Urmila Matondkar) सुपरहिट चित्रपट रंगीलामधलं (Rangeela) रंगीला रे, रंग रंग रंगीला रे, या गाण्याची धून वाजवण्यात आली. सौरव गांगुलीने हे गाणं ऐकताच ओळखलं आणि रंगीला हे उत्तर दिलं.

सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग या कार्यक्रमात जिंकलेली रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरणार आहेत. सौरव गांगुली फाऊंडेशन आणि वीरेंद्र सेहवाग फाऊंडेशनला ही रक्कम दिली जाणार आहे.

First published:

Tags: Amitabh Bachchan, KBC, Sourav ganguly, Virender sehwag