मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

‘कौन प्रवीण तांबे?’ ट्रेलर OUT, राहुल द्रविडचीही सिनेसृष्टीत एन्ट्री VIDEO

‘कौन प्रवीण तांबे?’ ट्रेलर OUT, राहुल द्रविडचीही सिनेसृष्टीत एन्ट्री VIDEO

Kaun Pravin Tambe

Kaun Pravin Tambe

मराठमोळा क्रिकेटपटू प्रवीण तांबे (Pravin Tambe) यांच्या संपूर्ण कारकीर्दीवर आधारित 'कौन प्रवीण तांबे' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये प्रवीणच्या चित्रपटाचे सूत्रसंचालन टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड(Rahul Dravid) यांनी केले आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 11 मार्च: मेरी कॉम(Mary Kom) असेल, एम. एस धोनी (MS Dhoni) किंवा सायना नेहवाल (Saina Nehwal) यांच्या आयुष्यावर तयार करण्यात आलेल्या बायोपिक नंतर आता आणखी एका खेळाडूच्या आयुष्यावर आणि त्याच्या क्रिकेटच्या प्रेमावर आधारीत एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठमोळा क्रिकेटपटू प्रवीण तांबे (Pravin Tambe) यांच्या संपूर्ण कारकीर्दीवर आधारित 'कौन प्रवीण तांबे' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये प्रवीणच्या चित्रपटाचे सूत्रसंचालन  टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड(Rahul Dravid) यांनी केले आहे.

आयपीएलमध्ये सर्वात जास्त वयात पदार्पण करणारा खेळाडू म्हणून प्रवीण तांबेला ओळखले जाते. तांबेने 2013 साली वयाच्या 41 व्या वर्षी आयपीएलमध्ये एन्ट्री केली होती. त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा टीझर नुकताच लॉंच करण्यात आला होता.‌ प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदे ‘कौन प्रवीण तांबे?’ या चित्रपटात त्याची भूमिका निभावत आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला असून, त्याला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

" isDesktop="true" id="677745" >

आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर क्रिकेटमध्ये यश मिळवणाऱ्या तांबेच्या आयुष्यावरील या चित्रपटात त्याची संपूर्ण कहाणी दाखवण्यात आली आहे.‌ केवळ क्रिकेट आणि क्रिकेट या गोष्टीसाठी जगणाऱ्या प्रवीणच्या चित्रपटाचे सूत्रसंचालन टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केले आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये द्रविड दिसून येतात. तर, या भूमिकेसाठी श्रेयस तळपदे याचेदेखील कौतुक केले जात आहे. जयप्रद देसाई यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 1 एप्रिल रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिजनी हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.

या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणारा श्रेयस तळपदे आपली प्रतिक्रीय व्यक्त केली आहे. प्रवीण तांबे यांची भूमिका साकारणे हे माझे भाग्य आहे. “‘इक्बाल’मध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर 17 वर्षांनी पडद्यावर प्रवीणची भूमिका साकारताना मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. अशी भूमिका आणि कथेची संधी एकदाच मिळते. चित्रीकरणाचा प्रत्येक मिनिट मला खूप आवडला. अशी भावना श्रेयसने यावेळी व्यक्त केली.

प्रवीण तांबेनं वयाच्या 41 व्या वर्षी आयपीएल मध्ये पदार्पण केलं. राजस्थान रॉयल्स, गुजरात लायन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांकडून तो सामने खेळला आहे. त्याने मुंबई संघाकडून विजय हजारे ट्रॉफीत पदार्पणही केलं होतं. खेळाडू ज्या वयात निवृत्तीचा विचार करतात, त्या वयात प्रवीण तांबेंला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली.

First published:

Tags: Entertainment, Rahul dravid