मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /कतरिनासोबत तुझं नातं काय? मोहम्मद कैफने दिलं भन्नाट उत्तर

कतरिनासोबत तुझं नातं काय? मोहम्मद कैफने दिलं भन्नाट उत्तर

कतरिना कैफ (Katrina Kaif) ही बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक. अल्पावधीतच तिने मोठं नाव कमावलं आहे. देशाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) आणि कतरिनामधलं एक कनेक्शन (Mohammad and Katrina connection) समोर आलं आहे.

कतरिना कैफ (Katrina Kaif) ही बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक. अल्पावधीतच तिने मोठं नाव कमावलं आहे. देशाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) आणि कतरिनामधलं एक कनेक्शन (Mohammad and Katrina connection) समोर आलं आहे.

कतरिना कैफ (Katrina Kaif) ही बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक. अल्पावधीतच तिने मोठं नाव कमावलं आहे. देशाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) आणि कतरिनामधलं एक कनेक्शन (Mohammad and Katrina connection) समोर आलं आहे.

पुढे वाचा ...

    मुंबई, 10 नोव्हेंबर : कतरिना कैफ (Katrina Kaif) ही बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक. अल्पावधीतच तिने मोठं नाव कमावलं आहे. सध्या तिच्या आणि विकी कौशलच्या (Vicky Kaushal) लग्नाबाबत सर्वत्र चर्चा सुरू असतानाच, देशाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) आणि कतरिनामधलं एक कनेक्शन (Mohammad and Katrina connection) समोर आलं आहे. विशेष म्हणजे मोहम्मद कैफने स्वतःच ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वीही सोशल मीडियावर मोहम्मद आणि कॅटरिना कैफबाबत कित्येक मीम्स व्हायरल झाले आहेत. आता मोहम्मद कैफच्या एका ट्विटमुळे ही गोष्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ट्विटरवर मोहम्मदने #AskKaif या हॅशटॅगच्या (Ask Kaif on twiter) मदतीने आपल्याला कोणतेही प्रश्न विचारा असं आवाहन युझर्सना केलं होतं. यामध्ये एका युझरने मोहम्मद आणि कतरिनाच्या कनेक्शनबाबत (How Katrina got her surname) विचारलं. त्यावर मोहम्मद कैफने अगदी मजेशीर उत्तर दिलं आहे.

    आस्क कैफ या सेशनमध्ये मोहम्मदने कित्येक प्रश्नांची उत्तरं दिली. यात एका युझरने त्याला विचारलं, की “सर, तुम्ही कॅटरिना कैफशी रिलेटेड आहात का? जर नसाल, तर भविष्यात तसं होण्याची कितपत शक्यता आहे?” यावर उत्तर देताना कैफ म्हणाला, “आतापर्यंत तरी मी तिच्याशी रिलेटेड नाही. बाकी मी आधीपासूनच हॅप्पीली मॅरिड आहे. हो, पण कतरीनाला कैफ आडनाव कसं मिळालं याबाबत मी एक गोष्ट ऐकली आहे. त्या गोष्टीनुसार तरी त्याचा माझ्या नावाशी संबंध आहे.”

    कैफच्या या उत्तरानंतर कतरिनाच्या नावाबाबत (Katrina Kaif Name story) असलेल्या थिअरीज पुन्हा चर्चेत आल्या आहेत. कित्येक जणांनी तिच्या नावाबाबत वेगवेगळे दावे केले आहेत. एका ट्विटर युझरने असं म्हटलं होतं, की कतरीनाचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला होता. तिचे वडील काश्मिरी असून, त्यांचं नाव मोहम्मद कैफ होतं, तर तिची आई सुझन टरकोट ब्रिटिश आहे. कतरिना अगदी लहान असतानाच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. ती आधी टरकोट आडनाव वापरत असे; मात्र भारतात आल्यानंतर तिने कैफ आडनाव वापरण्यास (Katrina Kaif changed surname) सुरुवात केली. कतरिनाने पूर्वी एकदा माध्यमांशी बोलताना हे सांगितलं होतं, की तिच्या वडिलांचा तिच्या धार्मिक, सामाजिक किंवा कोणत्याही वागण्यावर कसलाच प्रभाव नाहीये. तिची जडणघडण वेगळ्या प्रकारे झाली आहे.

    दुसऱ्या एका युझरने पोस्ट केलेल्या थिअरीनुसार, वडील काश्मिरी असल्यामुळे कतरिनाने भारतात आल्यानंतर आपलं नाव बदललं. एका दाव्यानुसार असंही म्हटलं जातं, की ती जेव्हा भारतात आली तेव्हा मोहम्मद कैफ अगदी प्रसिद्ध क्रिकेटपटू (Mohammad Kaif and Katrina story) होता. त्यामुळे तिनं आपलं आडनाव बदलून कैफ असं ठेवलं. याच दाव्याबद्दल मोहम्मद कैफ आपल्या ट्विटमध्ये बोलत आहे.

    दरम्यान, कतरिनाने आपलं आडनाव बदललं की नाही, किंवा बदललं असलं तर का बदललं याबाबत ती स्वतःच माहिती देऊ शकेल; मात्र मोहम्मद कैफचं हे उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

    First published:
    top videos