बुमराहवर रबाडाची टीका, 'गोलंदाजी जबरदस्त पण...'

बुमराहवर रबाडाची टीका, 'गोलंदाजी जबरदस्त पण...'

कसोटी रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रबाडानं बुमराह आणि आर्चरच्या गोलंदाजीचं कौतुक केलं पण दोघांनाही माध्यमं जास्तच भाव देतात असं म्हटलं आहे.

  • Share this:

दिल्ली, 09 सप्टेंबर : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं एका वर्षात कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. बुमराहनं विंडीजविरुद्ध हॅट्ट्रीक नोंदवली असून अशी कामगिरी करणारा तो भारताचा तिसरा खेळाडू आहे. बुमराहच्या गोलंदाजीचं अनेक दिग्गजांनी कौतुक केलं आहे. पण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कासिगो रबाडानं म्हटलं की, काही गोलंदाजांना माध्यमं डोक्यावर घेतात. त्यांना मोठं करून दाखवतात. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला असून पत्रकार परिषदेत रबाडानं बुमराहविरुद्ध वक्तव्य केलं आहे.

भारतात आल्यावर रबाडाला बुमराह आणि जोफ्रा आर्चर यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रबाडा म्हणाला की, मी त्या गोलंदाजांचा सन्मान करतो. दोन्ही चांगले गोलंदाज आहेत. पण माध्यमं त्यांना जरा जास्तच भाव देतात. आर्चरमध्ये नैसर्गिक गुणवत्ता आहे. तर बुमराह चमत्कार करत आहे. तुम्ही नेहमीच टॉपवर राहू शकत नाही.

रबाडा गेल्या काही महिन्यांपासून फॉर्ममध्ये नाही. त्यानं 21.77 च्या सरासरीनं 117 विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्यानं 27.34 च्या सरासरीनं 117 विकेट घेतल्या आहेत. मात्र, रबाडाची सरासरी आणि स्ट्राइक रेट दोन्ही आर्चर आणि बुमराहपेक्षा खराब आहेत. बुमराहनं 13.14 च्या सरासरीनं 14 आणि आर्चरनं 21 च्या सरासरीनं 13 विकेट घेतल्या आहेत. तर रबाडानं 23.57 च्या सरासरीनं 19 विकेट घेतल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याला 15 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तीन टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी संघ दिल्लीला पोहोचला आहे. पहिला टी 20 सामना धर्मशाळा इथं होणार आहे. तर दुसरा सामना मोहालीत 18 सप्टेंबरला आणि तिसरा सामना बेंगळुरुत 22 सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर तिन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.

VIDEO: मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांब रांगा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 12:07 PM IST

ताज्या बातम्या